Hashtagintro

IND vs NZ : कॅप्टन बदलला, 3 मोठे प्लेअर बाहेर, चौथ्या वनडेत टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असणार, मालिका जिंकायची मदार कोणावर?

IND vs NZ : कॅप्टन बदलला, 3 मोठे प्लेअर बाहेर, चौथ्या वनडेत टीम इंडियाची प्लेइंग 11 कशी असणार, मालिका जिंकायची मदार कोणावर?

ओव्हल येथे भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये चौथा वनडे सामना उद्या खेळवला जाणार आहे. या सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये अनेक बदल होणार आहे. कर्णधार गिल हा आता संघामध्ये खेळणार नाही. चौथा आणि पाचवा दोन्ही सामने तो खेळणार नाही. त्याच्या अनुपस्थितीमध्ये भारताच्या संघाची कमान ही श्रेयस अय्यरच्या हातात असणार आहे. दरम्यान, अंशुल कंबोजलाही संघातून वगळण्यात आले आहे. तर उद्याच्या सामन्यासाठी संघामध्ये ऋतुराज गायकवाडला संधी मिळण्याची शक्यता आहे. तो हिटमॅन रोहित शर्मा याच्यासोबत ओपनिंग करेल. तर यष्टीरक्षक आणि उत्कृष्ट फॉर्ममध्ये असलेला इशान किशनही एक पर्याय म्हणून उपलब्ध होऊ शकणार आहे. या मालिकेमध्ये अद्यापर्यंत एकही सामना न खेळलेला मोहम्मद सिराजही संघामध्ये खेळू शकतो.

१९ नोव्हेंबरपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेच्या तयारीसाठी कर्णधार गिल तयारी करत आहे. भारताने मालिकेतील सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. त्यानंतर तिसरा सामना हा पावसामुळे रद्द करण्यात आला आहे. आता उद्या मालिकेतील चौथा सामना आहे. भारत २-० ने आघाडीवर आहे. चौथा सामना जिंकण्यासाठी भारताचा प्रयत्न असेल. मालिका जिंकणं आता न्यूझीलंडला शक्य नाही. दोन्ही सामने त्यांनी जिंकले तर मालिका अनिर्णित राहिल.

दरम्यान, भारताच्या संघाची प्लेइं ११ उद्या कशी असणार याची उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. केएल राहुल कसोटी सामन्यासाठी गेला असल्याने त्याच्या जागेवर इशान किशनला संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. राहुल विकेटकिपर आहे. त्यामुळे इशानची जागा संघामध्ये निश्चित मानली जात आहे. पण इशान ऐवजी कुमार कुशाग्र हाही एक दुसरा पर्याय आहे, जो विकेट किपरिंग करु शकतो. पण त्याला प्लेइंग ११मध्ये संधी मिळण्याची शक्यता धूसर आहे, कारण इशान हा मधल्या फळीत फलंदाजी करु शकतो.

संभाव्य प्लेइंग ११

रोहित शर्मा, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली , श्रेयस अय्यर (कर्णधार), इशान किशन (यष्टीरक्षक), नमन धीर, अक्षर पटेल, आकिब नबी, गुरनूर ब्रार, अर्शदीप सिंग, मोहम्मद सिराज.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language