Hashtagintro

IND vs NZ : दुसऱ्या वनडेत विराट कोहली फ्लॉप, पण रचला इतिहास, रिकी पाँटिंगचा रेकॉर्ड मोडला

IND vs NZ : दुसऱ्या वनडेत विराट कोहली फ्लॉप, पण रचला इतिहास, रिकी पाँटिंगचा रेकॉर्ड मोडला

भारताचा स्टार क्रिकेटपटू विराट कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध पहिल्या वनडे मध्ये शानदार अर्धशतक झळकवलं होतं. दुसर्‍या वनडे मध्ये तो फ्लॉप ठरला. शनिवारी वेलिंगटनमध्ये सात चेंडूत त्याने 7 धावा केल्या. यात एक चौकार होता. कोहलीला वेगवान गोलंदाज जेकब डफीने चौथ्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर बाद केलं. कोहलीने ऑफ स्टम्पच्या लाइनमध्ये आलेला चेंडू ड्राइव्ह करण्याचा प्रयत्न केला. पण कव्हरला विल यंगकडे त्याने सोपा झेल दिला. कोहली वेलिंगटन वनडे मध्ये मैदानावर जास्त वेळ पाय रोवून उभा राहू शकला नाही. पण तो इतिहास रचण्यात यशस्वी ठरला. विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक धावा करणारा क्रिकेटपटू बनला आहे.

38 वर्षीय कोहलीने न्यूझीलंड विरुद्ध आतापर्यंत 38 वनडे सामन्यात 56.51 च्या सरासरीने 1978 धावा केल्या आहेत. यात सात शतकं आणि 11 अर्धशतकं आहेत. वर्ष 2010 मध्ये कोहली न्यूझीलंड विरुद्ध तो पहिला वनडे सामना खेळलेला. कोहलीने रिकी पाँटिंगचा दमदार रेकॉर्ड मोडला. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार राहिलेल्या रिकी पाँटिंगने न्यूझीलंड विरुद्ध 51 वनडे सामन्यात 45.83 च्या सरासरीने 1971 धावा केल्या होत्या. त्याने 6 सेंच्युरी आणि 12 अर्धशतकं झळकवलेली. कोहलीने वेलिंगटन वनडे मध्ये एक धाव घेताच त्याने पाँटिंगला मागे टाकलं. ऑकलंड वनडेमध्ये विराट कोहलीने 74 धावा केल्या होत्या. वनडे क्रिकेटमध्ये न्यूझीलंड विरुद्ध वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या फलंदाजांच्या बाबतीत सचिन तेंडुलकर तिसऱ्या स्थानावर आहे. सचिनने 42 सामन्यात 46.05 च्या सरासरीने न्यूझीलंड विरुद्ध 1750 धावा केल्या आहेत.

टीम इंडियाची खराब सुरुवात

वेलिंगटनमध्ये 135 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. कॅप्टन शुबमन गिल गोल्ड डक म्हणजे पहिल्या चेंडूवर आऊट झाला. गिलला डफीने दुसऱ्या ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर हेनरी निकोलस करवी कॅचआऊट केलं. त्यानंतर बॅटिंग आलेला कोहली आधी डॉट बॉल खेळला. मग पुढच्या चेंडूवर चौकार मारला. पाँटिंगचा रेकॉर्ड मोडला. पहिल्या वनडेत रोहित शर्मा शून्यावर बाद झालेला. दुसऱ्या वेलिंगटन वनडेत रोहितने 28 चेंडूत दोन चौकार आणि षटकाराच्या मदतीने 23 धावा केल्या. जॅमीसनच्या नवव्या ओव्हरमध्ये तो पॅवेलियनमध्ये परतला.

ODI मध्ये न्यूझीलंड विरुद्ध सर्वाधिक धावा

विराट कोहली (भारत) 1978 धावा

रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) 1971 धावा

सचिन तेंडुलकर (भारत) 1750 धावा

कुमार संगकारा (श्रीलंका) 1568 धावा

सनथ जयसूर्या (श्रीलंका) 1519 धावा

जॅक्स कॅलिस (साउथ अफ्रीका) 1449 धावा

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language