Hashtagintro

IND vs NZ : धावांचा पाऊस पाडला पण चर्चा मात्र सेलिब्रेशनची, कॅप्टन श्रेयसच्या ‘माना वेव्ह’ जल्लोषाचा नेमका इतिहास काय?

IND vs NZ : धावांचा पाऊस पाडला पण चर्चा मात्र सेलिब्रेशनची, कॅप्टन श्रेयसच्या ‘माना वेव्ह’ जल्लोषाचा नेमका इतिहास काय?

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील रोमांचक टी20 मालिकेदरम्यान मैदानावर खेळाडूंच्या खेळासोबतच त्यांच्या हटके सेलिब्रेशनचीही बरीच चर्चा रंगली. हॅमिल्टन येथील सेडन पार्कवर खेळल्या गेलेल्या अखेरच्या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने केलेल्या एका खास सेलिब्रेशनने संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष वेधून घेतले. अवघ्या 22 चेंडूंमध्ये तुफानी अर्धशतक झळकावल्यानंतर श्रेयसने ज्या अंदाजात आनंद साजरा केला, त्याची सध्या न्यूझीलंडमध्ये जोरदार चर्चा सुरू आहे.

धावांची पडझड अन् श्रेयसचे दमदार कमबॅक

हॅमिल्टनमधील पाचव्या टी20 सामन्यात भारताची सुरुवात अत्यंत खराब झाली होती. संघाच्या अवघ्या 19 धावांवर 2 महत्त्वाचे फलंदाज बाद झाले होते. अशा बिकट परिस्थितीत मैदानात उतरलेल्या श्रेयस अय्यरने सुरुवातीला डाव सावरला आणि नंतर न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर जोरदार हल्लाबोल केला. केवळ 22 चेंडूंमध्ये आपले अर्धशतक पूर्ण करत त्याने मालिकेत शानदार पुनरागमन केले.

काय आहे ‘माना वेव्ह’ सेलिब्रेशन?

शतक किंवा अर्धशतक झाल्यानंतर खेळाडू अनेकदा बॅट उंचावून किंवा वेगळ्या स्टाईलने आनंद साजरा करतात. मात्र, श्रेयसने अर्धशतक पूर्ण झाल्यावर आपला उजवा हात खांद्याजवळ नेला आणि तो प्रेक्षकांच्या दिशेने झटकला, जणू काही तो आपली ऊर्जा किंवा प्रेम चाहत्यांना अर्पण करत होता. त्याच्या या अनोख्या सेलिब्रेशनला ‘माना वेव्ह’ (Mana Wave) असं म्हणतात, ज्याचा थेट संबंध न्यूझीलंडच्या संस्कृतीशी आहे.

 

 

 

माओरी संस्कृतीशी जोडलेली आहे परंपरा

न्यूझीलंडमधील स्थानिक माओरी भाषेत ‘माना’ या शब्दाला विशेष महत्त्व आहे. याचा अर्थ प्रतिष्ठा, अधिकार, आध्यात्मिक शक्ती आणि सन्मान असा होतो. स्थानिक प्रेक्षकांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी हा खास इशारा वापरला जातो. 2024 मध्ये नेपियरमधील काही रस्ते कर्मचाऱ्यांनी टिकटॉक व्हिडीओद्वारे याची सुरुवात केली होती. पुढे पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक विजेता कयाकपटू फिन बुचर आणि न्यूझीलंडच्या ‘ब्लॅक फर्न्स’ रग्बी संघानेही विजयानंतर हाच अनोखा अंदाज दाखवला होता. आता श्रेयस अय्यरने न्यूझीलंडच्या धर्तावर हे सेलिब्रेशन करत तेथील संस्कृतीला अनोखी मानवंदना दिली आहे.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language