Hashtagintro

IND vs NZ: न्यूझीलंडविरुद्धच्या शेवटच्या दोन सामन्यात काय चुकलं? कर्णधार श्रेयस अय्यरने या चुका काढल्या

न्यूझीलंडने पाचव्या टी20 सामन्यात भारताचा 7 गडी राखून पराभव केला. या सामन्यात भारताने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 192 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. मात्र हे लक्ष्य न्यूझीलंडने 3 गडी गमवून 18व्या षटकात पूर्ण केलं. खरं तर या मालिकेतील सुरूवातीच्या तीन सामन्यात न्यूझीलंडचा संघ बॅकफूटवर होता. मात्र शेवटच्या दोन सामन्यात न्यूझीलंडने जोरदार कमबॅक केलं. या दोन्ही सामन्यात भारतीय संघाचं गणित चुकलं. मालिकेच्या शेवटी असं झाल्यानंतर क्रीडाप्रेमीही अचानक काय झालं? या विवंचनेत आहेत. कर्णधार श्रेयस अय्यर यानेही मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यात झालेल्या पराभवाचं विश्लेषण केलं. नेमकं काय चुकलं आणि कुठे सामना गमावला? याबाबत सांगितलं.
श्रेयस अय्यर पराभवाबाबत काय म्हणाला?
पाचव्या सामन्यातील पराभवाबाबत सांगताना श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘खरं सांगायचं तर, ती कामगिरी समाधानकारक होती. मधल्या षटकांमध्ये आम्हाला जी सुरुवात मिळाली, ज्याप्रकारे मी आणि fशानने गती निर्माण केली, ते पाहता आम्ही अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो. आम्ही एकापाठोपाठ एक विकेट गमावल्या. आणि मग अचानक नवीन फलंदाजावर दबाव आला. ती खेळपट्टी खेळायला सोपी नव्हती, विशेषतः जेव्हा चेंडू स्विंग होत होता आणि थोडा थांबत होता. आणि कधीकधी तो घसरतही होता. तुम्ही माझ्यासारखे आणि तिलकसारखे काही खेळाडू पाहिले असतील, आम्ही अशाच प्रकारे बाद झालो. त्यामुळे हो, ते आव्हानात्मक होते, विशेषतः त्या हार्ड लेंथवर.’

https://www.prahaar.in/2026/11/01/ind-vs-nz-india-defeated-in-the-fifth-t20-match-as-well-new-zealand-win-by-7-wickets/

विजयासाठी दिलेल्या धावांबाबत श्रेयस अय्यर म्हणाला की, ‘191 धावांपर्यंत पोहोचणे, मला वाटते की ते समाधानकारक होते. मला वाटते की आम्ही आमच्या गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात अजूनही अधिक चांगली कामगिरी करू शकलो असतो. आम्ही थोडे ढिसाळ होतो. पण खूप काही शिकायला मिळालं. मला वाटतं की परदेशात, न्यूझीलंडमध्ये येऊन, इतक्या वेगवेगळ्या प्रसंगी, वेगवेगळ्या मैदानांवर खेळायला मिळालं. हो, खूप काही शिकायला मिळालं.’

भारतीय टी20 संघाची सध्याची स्थिती आणि सुधारणा करण्याच्या क्षेत्रांबद्दल श्रेयस अय्यर म्हणाला का, ‘मला वाटतं की आज आम्हाला एक संधी मिळाली होती, ज्याचा आम्ही फायदा घेऊ इच्छित होतो, पण आम्ही घेऊ शकलो नाही. पण, आम्ही विचारमंथन करू शकतो आणि आम्हाला काही गोष्टींवर काम करावे लागेल, विशेषतः क्षेत्ररक्षणावर. खेळाचा हा एक पैलू आहे ज्यामध्ये आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे. पण खरं सांगायचं तर, जेव्हा तुम्ही अशा अंधुक प्रकाशात आणि निरभ्र आकाशाखाली खेळता, तेव्हा ते इतकं सोपं नसतं. भारतात आम्हाला असं वातावरण फारसं मिळत नाही. पण हो, हा एक उत्तम शिकण्याचा अनुभव आहे.’

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language