Hashtagintro

IND vs NZ: भारताने न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या कसोटी केली ऐतिहासिक कामगिरी, 149 वर्षात पहिल्यांदाच असं घडलं

न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे. वेलिंग्टन कसोटी सामन्यातील पहिला डाव न्यूझीलंडने 9 गडी गमवून 720 धावांवर घोषित केला. या डावादरम्यान भारतीय संघाने एक वर्ल्ड रेकॉर्ड केला आहे. (Photo: BCCI Twitter) भारतीय संघाने 149 वर्षांच्या कसोटी इतिहासात एक मोठी कामगिरी नोंदवली आहे. भारताने पहिल्या डावात सात विकेट्सने 50हून अधिक धावांची भागीदारी केली. यापूर्वी असं कधीच झालं नव्हतं. (Photo: BCCI Twitter) भारतीय संघाने वेलिंग्टनच्या बेसिन रिजर्व मैदानात या विक्रमाची नोंद केली. या डावाची सुरूवात केएल राहुल आणि यशस्वी जयस्वाल यांनी केली. या जोडीने पहिल्या विकेटसाठी 167 चेंडूत 130 धावा केल्या. (Photo: BCCI Twitter) दुसऱ्या विकेटसाठी केएल राहुल आणि देवदत्त पड्डिकल यांनी 331 चेंडूत 165 धावांची भागीदारी केली. तर तिसऱ्या विकेटसाठी शुभमन गिल आणि केएल राहुलने 91 धावा केल्या. (Photo: BCCI Twitter) चौथ्या विकेटसठी शुभमन गिल आणि ऋषभ पंत यांच्यात शतकी भागीदारी झाली. शुभमन गिल 98 धावांवर असताना बाद झाला आणि त्याचं शतक ठोकण्याचं स्वप्न भंगलं. (Photo: BCCI Twitter) पाचव्या आणि सहाव्या विकेटसाठी ऋषभ पंतने 50हून अधिक धावांची भागीदारी केली. पाचव्या विकेटसाठी ऋषभ पंत आणि अंशुल कंबोज यांच्यात 68 धावांची भागीदारी झाली. त्यानंतर ध्रुव जुरेलसोबत 75 धावांची भागीदारी केली. सातव्या विकेटसाठी ध्रुव जुरेलने वॉशिंग्टन सुंदरसोबत 54 धावांची भागीदारी केली. (Photo: BCCI Twitter)

 

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language