Hashtagintro

IND vs NZ: वेलिंग्टन कसोटीत टीम इंडियाचं विजयाचं गणित कसं चुकलं? सौरव गांगुलीने उपस्थित केला प्रश्न

भारत न्यूझीलंड पहिला कसोटी सामना ड्रॉ झाला. या सामन्यावर खरं तर भारताची मजबूत पकड होती. मात्र गोलंदाजी हवी तशी झाली नाही आणि न्यूझीलंडचा संघ पराभव रोखण्यात यशस्वी ठरला. या निकालानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली याने संघातील फिरकी गोलंदाजीच्या पर्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जेव्हा खेळपट्टी सपाट असते तेव्हा एका खऱ्याखुऱ्या फिरकी गोलंदाजाची गरज असते, हे सौरव गांगुलीने जोर देऊन सांगितलं. सौरव गांगुली यांनी सोशल मीडियावर याबाबत थेट प्रश्न विचारला आहे. सौरव गांगुलीने एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं की, भारतीय संघाने या मालिकेतील व्हाइट बॉल असो की आता रेड बॉल क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केली आहे. सौरव गांगुली म्हणाला की, ‘फलंदाजांची कामगिरी चांगली दिसली. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहीजे की देशाबाहेर कसोटी सामना जिंकण्यासाठी आणि कालांतराने सपाट होणाऱ्या खेळपट्ट्यांवर एका अस्सल फिरकी गोलंदाजाची गरज असते.’
काय म्हणाला सौरव गांगुली?
वेलिंग्टन कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भारताने 720 धावा केल्या होत्या. तसेच 352 धावांची मजबूत आघाडी घेतली होती. मात्र दुसऱ्या डावात न्यूझीलंडने 5 गडी गमवून 239 धावा केल्या आणि भारतीय गोलंदाजांना रडवलं. भारतीय गोलंदाज विकेट घेण्यासाठी घाम गाळत होते. पण एकाही गोलंदाजाला यश मिळालं नाही. असं असताना सौरव गांगुलीने भारतीय फिरकीच्या पर्यायावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वॉशिंग्टन सुंदरकडे मुख्य फिरकी गोलंदाज पर्याय म्हणून पाहू नये, असंही सौरव गांगुली म्हणाला. त्याने फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि मानव सुथार यांना गैरहजेरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. सौरव गांगुलीने थेट प्रश्न विचारला की, ‘वॉशिंग्टन अष्टपैलू म्हणून खेळू शकतो. कुलदीप किंवा मानव सुथार कुठे आहेत?’

India has been brilliant this series .. white ball and now red ball .. the batting application looked super .. but they must understand to win test matches away a genuine spinner is a must on pitches which get flat with time ..u have to play one in test cricket .. Washington can play as an allrounder ..@bcci
— Sourav Ganguly (@SGanguly99) November 23, 2026

https://www.prahaar.in/2026/11/23/wtc-points-table-2027-wellington-test-ends-in-a-draw-making-team-indias-path-to-the-final-tougher-find-out-how/

पहिला कसोटी सामना ड्रॉ झाल्याने भारतीय गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. वॉशिंग्टन सुंदर फलंदाजीला नियंत्रण आणि खोली देतो. पण गांगुलीच्या मते, भारताला एक चांगल्या फिरकी गोलंदाजाची गरज असून तो विकेट घेऊ शकेल. विशेष करून जेव्हा परिस्थिती अनुकूल नसते तेव्हा.. 27 नोव्हेंबरपासून क्राइस्टचर्च येथे दुसरा कसोटी सामना होणार आहे. या सामन्यातही तशीच खेळपट्टी असण्याची शक्यता आहे. सौरव गांगुली यांनी कुलदीप यादव आणि मानथ सुथारबाबत विचारलेले प्रश्न योग्यच आहेत. कारण न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत दोघांपैकी एकही गोलंदाज नाही. ऑगस्टमध्ये श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत दोघंही संघाचे भाग होते. सध्याच्या संघात वॉशिंग्टन सुंदरला रवींद्र जडेजा हा एकमेव पर्याय आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language