Hashtagintro

IND vs NZ, 2nd Test: जसप्रीत बुमराहने सामन्याच्या दरम्यान बदलला रन अप, 11 वर्षापूर्वीच्या स्टाईलमध्ये गोलंदाजी Video

भारत न्यूझीलंड यांच्यात दुसरा कसोटी सामना सुरू असून पहिल्या दिवसाचा खेळ संपला. न्यूझीलंडने पहिल्या दिवशी 5 गडी गमवून 246 धावा केल्या. या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीची चर्चा झाली. त्याला कारणंही तसंच आहे. कारण जसप्रीत बुमराह दहा वर्षे जुन्या गोलंदाजीच्या शैलीत गोलंदाजी करताना दिसला. जसप्रीत बुमराहची बदलेली शैली पाहून क्रीडाप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला. या सामन्याच्या सुरूवातीला बुमराहने नियमित रनअपसह गोलंदाजी केली. पण पहिला सेशन संपल्यानंतर त्याच्या गोलंदाजीच्या शैलीत बदल झाला. यावेळी त्याच्या सुरूवातीच्या दिवसांची आठवण क्रीडाप्रेमींना झाली. कारण जसप्रीत बुमराहने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाय ठेवला तेव्हा त्याच्या गोलंदाजीच्या शैलीची चर्चा रंगली होती. त्याच्या हातून चेंडू सोडण्याची आणि पोझिशन खूपच वेगळी होती. गोलंदाजीवेळी क्रिझजवळ पोहोचताना जसप्रीत बुमराह दोन्ही हाताने चेंडू समोर पकडतो. त्यामुळे शरीरासोबत एक त्रिकोण होतो. क्राइस्टचर्चमध्ये बुमराहने अशीच गोलंदाजी सुरू केली.
बुमराहच्या गोलंदाजीच्या शैलीत काय बदल?
दुसऱ्या सत्रात जसप्रीत बुमराहने रनअपमध्ये बदल पाहायला मिळाला. यावेळी बुमराहने दोन्ही हातात चेंडू धरण्याऐवजी एकाच म्हणजेच उजव्या हातात ठेवला आणि धावला. या बदलामुळे समालोचन करणारं पॅनेलही आश्चर्यचकीत धाला. कारण त्यांनी या शैलीबाबत बरीच चर्चा केली होती. आता जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा जुन्या शैलीत गोलंदाजी करताना दिसला. त्याचा एक व्हिडीओही सोसळ मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यात एका युझर्सने 2015 मधील एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. यात जसप्रीत कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळात अशाच पद्धतीने गोलंदाजी करायचा.

https://t.co/kL85TpF3Bt
— CB (@cveditss) November 27, 2026

https://t.co/l2xap26dwj
— Bishontherockz (@BishOnTheRockx) November 27, 2026

https://www.prahaar.in/2026/11/27/mohammed-sirajala-dropped-from-playing-11-of-ind-vs-nz-christchurch-test-gurnoor-brarcha-inclusion-instead/
जसप्रीत बुमराहचा पहिला दिवस कसा गेला?
जसप्रीत बुमराहने गोलंदाजीच्या शैलीत अचानक बदल का केला? या प्रश्नाचं उत्तर अनुत्तरीत आहे. पण त्याच्या गोलंदाजीत काही बदल झालेला नाही. दिवसाच्या शेवटच्या सत्रात नवा चेंडू आला तेव्हा बुमराहला पुन्हा गोलंदाजीसाठी बोलवण्यात आलं. तेव्हा त्याने दोन्ही हातांनी चेंडू पकडत आपली नेहमीची शैली दाखवली. असं असताना पहिला दिवस काही बुमराहसाठी चांगला गेला नाही. त्याने पहिल्या षटकात टॉम लॅथमला बाद केलं होतं. पण न्यूझीलंडने डीआरएस घेतल्याने पंचांना हा निर्णय बदलावा लागला. यानंतर जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा सामना करणं न्यूझीलंडच्या फलंदाजांना कठीण गेलं. दिवस अखेर बुमराहने 19 षटकात 37 धावा दिल्या, पण विकेट मिळाली नाही.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language