Hashtagintro

IND vs PAK: स्वत: संथ खेळला पण दोष ‘त्या’ एकट्याला दिला, पाकविरुद्ध पराभवानंतर तिलक वर्मा काय म्हणाला?

IND vs PAK: स्वत: संथ खेळला पण दोष ‘त्या’ एकट्याला दिला, पाकविरुद्ध पराभवानंतर तिलक वर्मा काय म्हणाला?

Tilak Verma On IND vs PAK Match: रायझिंग स्टार्स आशिया कप २०२६ च्या हाय-व्होल्टेज सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान ‘अ’ संघाकडून भारत ‘अ’ संघाला ४८ धावांनी पराभव पत्करावा लागला. पाकिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ४९.२ षटकांत ३१३ धावा केल्या. प्रत्युत्तरात, भारतीय संघ ४९.१ षटकांत २६५ धावांवर सर्वबाद झाला. कर्णधार तिलक वर्माने भारतासाठी शतक झळकावले असले तरी, १४९ चेंडूंतील १०० धावांची (६७.१ स्ट्राइक रेट) त्याची अत्यंत संथ खेळी विजय मिळवून देण्यात अपयशी ठरली. पराभवानंतर, कर्णधार तिलक वर्माने सामना भारताच्या हातून कसा निसटला याबद्दल उघडपणे भाष्य केले.

सामन्यानंतरच्या सादरीकरणादरम्यान, भारत ‘अ’ संघाचा कर्णधार तिलक वर्माने कबूल केले की, “ज्या क्षणी संघाला धावगती वाढवण्याची गरज होती, त्याच क्षणी विकेट पडल्याने संपूर्ण समीकरणच बिघडले.” तिलक म्हणाला, “अभिषेक शर्माने ज्या प्रकारे सुरुवात केली आणि त्यानंतर मधल्या फळीत शहबाज अहमदने माझ्यासोबत जी भागीदारी केली, ती निर्णायक होती. पण दुर्दैवाने, जेव्हा आम्हाला जलद धावा करण्याची गरज होती, तेव्हाच शहबाज बाद झाला. जर तो आणखी दोन षटके खेळपट्टीवर राहिला असता, तर मी सामना भारताच्या बाजूने संपवू शकलो असतो.”

१४९ चेंडूंमध्ये झळकावलेल्या आपल्या झुंजार पण संथ शतकाविषयी आणि जबाबदारीने डाव सांभाळण्याच्या दृष्टीने ही आपली सर्वोत्तम फलंदाजी होती का, असे विचारले असता तिलक म्हणाला, “मी तसे म्हणणार नाही. माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण तो असतो, जेव्हा आम्ही सामना जिंकतो. जर मी सामना जिंकलो नाही, तर तो माझ्यासाठी सर्वोत्तम क्षण नसतो. मला नेहमीच डाव शक्य तितका पुढे न्यायचा असतो आणि आज माझा तोच प्रयत्न होता. जर दुसऱ्या एखाद्या फलंदाजाने मला साथ दिली असती, तर मी सामना जिंकू शकलो असतो. पण एक कर्णधार म्हणून तुम्हाला जबाबदारी आणि दबाव दोन्ही घ्यावे लागतात आणि मला ते करायला आवडते.”

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language