Hashtagintro

IND vs ZIM : कॅप्टन बनताच स्मृती मंधानाने पहिल्या वनडेमध्ये मारली बाजी, या चार खेळाडूंचं आवर्जून केलं कौतुक

IND vs ZIM : कॅप्टन बनताच स्मृती मंधानाने पहिल्या वनडेमध्ये मारली बाजी, या चार खेळाडूंचं आवर्जून केलं कौतुक

भारताच्या महिला क्रिकेट टिमची कॅप्टन बनल्यानंतर स्मृती मंधानाने विजयी सुरुवात केली आहे. शुक्रवारी पहिल्या महिला वनडे क्रिकेट मॅचमध्ये झिम्बाब्वेवर नऊ विकेटने विजय मिळवला. सामन्यानंतर स्मृतीने श्री चरणी, क्रांती गौडच्या गोलंदाजीचं तसचं प्रतिका रावल आणि शेफाली वर्माच्या बॅटिंगचं कौतुक केलं. श्री चरणीने 23 धावा देऊन चार विकेट काढल्या. करिअरमधील सर्वश्रेष्ठ प्रदर्शन तिने केलं. प्रतिका रावलने नाबाद 100 धावा केल्या. तिचं हे तिसरं वनडे शतक आहे. शेफाली वर्माने नाबाद 64 धावा केल्या. भारताने झिम्बाब्वेवर नऊ विकेट राखून आरामात विजय मिळवला. तीन सामन्यांच्या सीरीजमध्ये 1-0 अशी आघाडी घेतली. क्रांती गौडने तीन विकेट सुद्धा काढले.

“गोलंदाजांनी वेगवेगळ्या मैदानात स्वत:ला चांगल्या पद्धतीने तयार केलय. श्री चरणीने चांगली गोलंदाजी केली. क्रांतीने सुद्धा प्रभावित केलं. फिल्डिंगमध्ये आम्ही काही सोप्या कॅच सोडल्या” असं मंधानाने सामन्यानंतर सांगितलं. “फलंदाजीत प्रतिका आणि शेफालीला चांगला सूर सापडला. आम्ही बऱ्याच टाइमनंतर 50 ओव्हरचं क्रिकेट खेळतोय. मागच्या सात महिन्यात आम्ही 20 क्रिकेटचं खेळलोय. खेळाडूंसोबत संवाद आवश्यक आहे” असं स्मृती मंधानाने सांगितलं. तिन्ही फॉर्मेटमध्ये भारताच्या महिला टीमची कॅप्टन बनल्यानंतर मंधना पहिल्यांदा वनडे मध्ये कॅप्टन म्हणून मैदानात उतरली होती.

इनिंग परफेक्ट होती

“‘प्लेयर ऑफ द मॅच’चा पुरस्कार मिळवणाऱ्या प्रतिकाने 96 चेंडूत नाबाद 100 धावा करताना 15 चौकार लगावले.टीमसाठी योगदान देणं नेहमीच खास असतं. शक्य होईल तितकावेळ फलंदाजी करण्याचा प्रयत्न होता. आजचा दिवस शानदार होता. आजची इनिंग परफेक्ट होती. फलंदाज म्हणून तुम्हाला शिकायला मिळतं” असं प्रतिका म्हणाली.

निश्चित आत्मविश्वास वाढेल

“चेंडूला चांगला स्पिन मिळेल यावर लक्ष दे, असं गोलंदाजी कोच अविष्कार साळवी यांनी मला सांगितलं होतं. आपला खेळ आणि आपल्या क्षमतांबद्दल विचार कर. आपल्या ताकदीनुसार गोलंदाजी कर. त्यामुळे निश्चित आत्मविश्वास वाढेल. पण पुढेही मला प्रत्येक दिवशी चांगलं प्रदर्शन करण्यावर लक्ष द्यायचं आहे” असं श्री चरणीने मॅच नंतर सांगितलं.

तसं आम्ही खेळलो नाही

“आम्हाला जसं खेळायला पाहिजे होतं, तसं आम्ही खेळलो नाही. आम्ही 100 धावा कमी केल्या. गोलंदाजी करताना काही संधी गमावल्या. आम्ही योग्य दिशा आणि टप्प्यावर गोलंदाजी केली नाही” असं झिम्बाब्वेची कर्णधार नोमवेलो सिबांडा म्हणाली.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language