आयपीएल जेव्हा २००८ साली सुरु झाले तेव्हा आठ टीम होत्या. यानंतर २०११ साली आयपीएल टीमची संख्या दहा झाली, २०१२ साली ९ आणि २०१३ साली पुन्हा आठ झाली.
आता अलिकडेच २०२२ साली लखनऊ आणि गुजरातच्या टीम आयपीएलसमध्ये सामील झाल्या. आता २०२८ मध्ये आणखी दोन आयपीएल टीम मिळू शकतील अशी शक्यता नाकारु शकत नाही.
आता २०२८ मध्ये आयपीएलच्या आणखी दोन टीम वाढू शकतात, यात महाराष्ट्र आणि गुजरातच्या एक-एक टीम सामील होण्याची शक्यता आहे. पुणे आणि बडोदा असे दोन संघ असणार आहे असे म्हटले जात आहे.
२०२८-२०३२ या कालावधीसाठी नव्याने मीडिया राईट्सची विक्री होणार असल्यामुळे २०२८ पासून दोन नवे संघ आयपीएलमध्ये आणण्याची बीसीसीआयची तयारी असल्याचे म्हटले जात आहे.
आयपीएलची लोकप्रियता पाहता नव्या फ्रॅन्चायजीची किंमत १ अरब डॉलर म्हणजेच ८,३०० कोटी आसपास राहण्याची शक्यता आहे. या टीममध्ये गुंतवण्यासाठी फक्त भारतातील बिझनेसमॅनला रस नाहीये तर परदेशातील गुंतवणूकदारांनी यात रस असल्याचं वृत्त समोर आले आहे.
Source: TV9 Marathi Sports





