Hashtagintro

IPL 2027 Retention : नवीन लग्न झाल्याच्या आनंदात असलेल्या काव्या मारनला ट्रेविस हेडने दिलं दु:ख, SRH समोर उभं राहिलं नवीन संकट

IPL 2027 Retention : नवीन लग्न झाल्याच्या आनंदात असलेल्या काव्या मारनला ट्रेविस हेडने दिलं दु:ख, SRH समोर उभं राहिलं नवीन संकट

आयपीएल 2027 च्या रिटेंशन आधी सनरायजर्स हैदराबादची मालकीण काव्या मारनला धक्का बसला आहे. टीमचा खतरनाक आणि स्फोटक ओपनर ट्रेविस हेडने आंतरराष्ट्री शेड्यूल आणि वर्कलोड मॅनेजमेंटमुळे आयपीएल 2027 मधून माघार घेतली आहे. ही बातमी समोर आल्यानंतर ऑरेंज आर्मीच्या गोटात धाकधूक वाढली आहे. कारण ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्माच्या जोडीने मागच्या काही वर्षात खोऱ्याने धावा काढल्या होत्या. हेडच्या नसण्याचा SRH च्या फलंदाजीवर परिणाम होऊ शकतो. हेड शिवाय हैदराबादचा कर्णधार पॅट कमिन्स सुद्धा या सीजनमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.

ट्रेविड हेड नसल्यामुळे SRH ची फलंदाजी कमकुवत होईल. पण काव्या मारनच्या फ्रेंचायजीची पर्स मजबूत होईल. हेडला 2025 च्या मेगा ऑक्शनआधी 14 कोटी रुपयात रिटेन करण्यात आलं होतं. आता हेड बाजूला झाल्याने ही सगळी रक्कम मिनी ऑक्शनमध्ये हैदराबाद टीमला उपयोगी ठरेल. ते या रक्कमेत दोन ते तीन चांगले प्लेयर घेऊ शकतात. ट्रेविस हेडचा SRH साठी रेकॉर्ड खूप शानदार आहे. त्याने 43 सामन्यात 1351 धावा केल्या आहेत. त्याचा स्ट्राइक रेट 176 पेक्षा जास्त आहे. अभिषेक शर्मा सोबतच्या त्याच्या ओपनिंग पार्टनरशिपने टी20 क्रिकेटमध्ये वादळ आणलं होतं. त्यांच्या जोडीची धावा बनवण्याची प्रतिओव्हर सरासरी 12.27 होती.

हैदराबादच्या पर्समध्ये किती कोटी राहणार?

आज 17 नोव्हेंबर रिटेंशनची शेवटची तारीख आहे. त्या आधी एसआरएचने आपल्या टीममध्ये काही मोठे बदल केले आहेत. लेग स्पिनर जीशान अंसारीला दिल्ली कॅपिटल्सकडे देऊन डावखुरा वेगवान गोलंदाज टी नटराजनला संघात घेतलं आहे. त्या शिवाय खलील अहमद आणि नाथन एलिस यांचा टीम मध्ये समावेश केला आहे. हर्षल पटेलला 4 कोटी रुपयात गुजरात टायटन्सशी ट्रेड केलं आहे. 16 डिसेंबरला गोव्यामध्ये मिनी ऑक्शन होणार आहे. त्यासाठी काव्या मारन आणि एसआरएचची मॅनेजमेंट नव्याने रणनिती बनवणार आहे. ट्रेविस हेड बाहेर गेल्यामुळे जे 14 कोटी पर्समध्ये असतील, त्याचा वापर करुन चांगल्या खेळाडूंना टीममध्ये घेण्यावर फ्रेंचायजीचा फोकस असेल. अभिषेक शर्मा सोबत त्याच तोडीचा दुसरा ओपनर आवश्यक आहे. पावरप्लेमध्ये गोलंदाजांवर हुकूमत गाजवणं ही अभिषेक शर्माची खासियत आहे.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language