Hashtagintro

Israel Election : नेतान्याहू यांना जबर धक्का, इस्रायलच्या पंतप्रधानपदाची खूर्ची संकटात, अरबी पक्ष मोठा गेम करण्याच्या तयारीत!

Israel Election : नेतान्याहू यांना जबर धक्का, इस्रायलच्या पंतप्रधानपदाची  खूर्ची संकटात, अरबी पक्ष मोठा गेम करण्याच्या तयारीत!

Israel Election Update : इस्रायलमध्ये तेथील क्नेसेट या सर्वोच्च कायदेमंडळासाठी निवडणूक पार पडली. या निवडणुकीचा निकालही लागला असून सत्ताधारी बेंजामीन नेत्यान्याहू यांना जबर धक्का बसला आहे. त्यांच्या पक्षाला तसेच आघाडीला बहुमत मिळालेले नाही. विशेष म्हणजे त्यांच्या लिकूड पक्षासह प्रमुख विरोधक असलेल्या इस्रायलचे माजी लाष्करप्रमुख गाडी आयसेनकोट यांच्या शयर या पक्षालाही बहुमत मिळालेले नाही. कोणालाही बहुमत न मिळाल्याने तेथे सत्तास्थानेसाठी अन्य पक्षांची मदत घेण्याचा प्रयत्न केला जातोय. विशेष म्हणजे शयर पक्षाला अरबी पक्ष पाठिंबा देण्याची शक्यता असून नेतान्याहू यांना सत्तेतून पायऊतार व्हाे लागते की काय? अशी शंका व्यक्त केली जातेय.

अरबी पक्षांनी 19 जागा मिळवल्या

समोर आलेल्या माहितीनुसार इस्रायलच्या राजकारणातील राआम (Ra’am) आणि जॉइंट लिस्ट (Joint List) हे दोन प्रमुख अरबी पक्ष गाडी आयसेनकोट यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. या दोन्ही पक्षांनी एकूण 19 जागा जिंकलेल्या आहेत. इस्रायलमध्ये सत्ता हवी असेल तर एकूण 61 जागा मिळवणे गरजेचे आहे. या दोन अरबी पक्षांचे समर्थन मिळाल्यास गाडी आयसेनकोट सत्ता स्थापन करू शकतात.

गाडी आयसेनकोट यांना दिला जाऊ शकतो पाठिंबा

टाईम्स ऑफ इस्रायलच्या रिपोर्टनुसार जॉइंट लिस्ट हा पक्ष नेतान्याहू यांना विरोध करणाऱ्या पक्षांना बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे. या पक्षाला सत्तेत थेट सहभागी व्हायचे नाही. परंतु नेतान्याहू यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी पक्ष गाडी आयसेनकोट यांना पाठिंबा देऊ शकतो. यासह राआम हा पक्षदेखील नेतान्याहू यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे. हा पाठिंबा मिळताच आयसेनकोट यांचा पंतप्रधानपदाचा मार्ग मोकळा होऊ शकतो.

नेतान्याहू यांच्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

दुसरीकडे नेतान्याहू हेदेखील आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी धडपड करताना दिसत आहेत. त्यामुळे पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 2023 सालच्या हमासच्या हल्ल्यानंतर इस्रायलमध्ये पहिल्यांदाच या निवडणुका झाल्या. यात नेतान्याहू यांच्या पक्षाला 53 जागा मिळाल्या. याआधीच्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाला 68 जागा मिळाल्या होत्या. अरबी पक्षांना एकूण 19 जागा मिळालेल्या आहेत. येथे एकूण 120 जागांसाठी निवडणूक झाली होती.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language