बिग बॉस मराठी फेम अभिनेत्री जान्हवी किल्लेकर सोशल मीडियावर कायम सक्रिय असते आणि तिच्याविषयीचे अपडेट्स चाहत्यांसोबत शेअर करते. अभिनेत्री तिचे हटके फोटोही शेअर करते. आता अभिनेत्रीनं नवीन फोटो शेअर केले आहेत.
जान्हवी किल्लेकरनं I phone 18 pro max.. ने फोटो काढले असून हे तिचं नवीन आकर्षण असल्याचं म्हटलं आहे.
जान्हवीनं जीन्स आणि हटके टॉप परिधान केला असून अभिनेत्रीच्या टॉपने चाहत्यांचं लक्ष वेधलं आहे.
जान्हवीने जीन्सच्या पॅटर्नमधील टॉप परिधान केलाय. त्यामुळे काहींनी अभिनेत्रीला ट्रोलसुद्धा केलं आहे.
एका नेटकाऱ्याने लिहिलं की, 'जीन्स कमरेच्या वर घालायची असते, एवढी पण वर नाही.' तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, 'ती तूच आहेस ना बिग बॉस टॉप 5 मधून पैसे घेऊन स्वाभिमान विकला होतास' काही नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या फोटोवर हार्ट शेअर करत कमेंट्स केल्या आहेत.
Source: TV9 Marathi National





