Hashtagintro

Jailer 2 OTT Release : रजनीकांत स्टारर ‘जेलर 2’ चा अनकट व्हर्जन कधी होणार प्रदर्शित! 30 मिनिटांच्या एक्स्ट्रा फुटेजसह येणार पाहता

Jailer 2 OTT Release : रजनीकांत स्टारर ‘जेलर 2’ चा अनकट व्हर्जन कधी होणार प्रदर्शित! 30 मिनिटांच्या एक्स्ट्रा फुटेजसह येणार पाहता

चित्रपटगृहात एखादा चित्रपट पाहताना काही कलाकारांचे सीन कमी असल्याची किंवा काही प्रसंग वगळल्याची चर्चा अनेकदा होते. पण तेच सीन ओटीटीवर पाहायला मिळाले तर? ती चाहत्यांसाठी मोठी पर्वणी ठरते. सुपरस्टार रजनीकांत यांच्या ‘जेलर 2’ चित्रपटाबाबत सध्या अशीच चर्चा सुरू आहे. या चित्रपटाच्या OTT व्हर्जनमध्ये जवळपास 30 मिनीटांच एक्स्ट्राचं फुटेज पाहायला मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित ‘जेलर 2’ हा चित्रपट 15 ऑक्टोबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. रजनीकांत यांच्यासोबत या चित्रपटात मोहनलाल, विजय सेतुपती, हृतिक रोशन, शिवराजकुमार, रम्या कृष्णन, एस.जे. सूर्या आणि विद्या बालन यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. चित्रपटातील मोठी स्टारकास्ट हे चाहत्यांसाठी खास आकर्षण आहे.

मिडिया रिपोर्टनुसार, चित्रपटाच्या थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या सीनमधून काही दृश्य वगळण्यात आली होती. आता OTT वर चित्रपटाचा अनकट व्हर्जन प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
या व्हर्जनमध्ये जवळपास 30 मिनिटांचं एक्स्ट्राचं फुटेज पाहायला मिळणार अशी चर्चा आहे. यामध्ये मोहनलाल, विजय सेतुपती आणि हृतिक रोशन यांच्या काही सीनचा समावेश असू शकतो. अभिनेता संथानमचा कॅमिओ देखील या उरलेल्या सीन्समध्ये पाहायला मिळू शकतो.

विशेष म्हणजे, संथानम चित्रपटाच्या शूटिंग पूर्ण झाल्याच्या व्हिडिओमध्ये दिसला होता.मात्र थिएटरमध्ये प्रदर्शित झालेल्या अंतिम चित्रपटामध्ये त्याचे सीन्स पाहायलाच मिळाले नाही. अशी माहिती आहे. मोहनलाल आणि विजय सेतूपती यांच्या भूमिकांमधील काही भागही कमी करण्याच आल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे कलाकार OTTवर दिसणार का याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

चित्रपटाच्या OTT रिलीजबाबतही काही माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, ‘जेलर 2’ 10 नोव्हेंबरनंतर OTTवर येण्याची शक्यता आहे. अॅमेझॉन प्राईम व्हिडिओवर चित्रपट प्रदर्शित होऊ शकतो. असंही सांगितलं जात आहे. मात्र रिलीजची नेमकी तारीख आणि प्लॅटफ़ॉर्म, 30 मिनिटांच्या फुटेजबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही. त्यामुळे थिएटरमध्ये पाहिलेल्या चित्रपटापेक्षा OTT वर काही वेगळं पाहायला मिळणार का, याची उत्सुकता रजनीकांत यांच्या चाहत्यांमध्ये निर्माण झाली आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language