मोबाईल रिचार्जचे दर वाढल्यामुळे अनेक जण स्वस्त आणि फायदेशीर प्लॅनच्या शोधात आहेत. विशेष म्हणजे, ज्यांचा मोबाईलचा वापर कॉलिंगसाठी जास्त आणि इंटरनेटसाठी कमी असतो त्यांना कमी किमतीचा प्लॅन हवा असतो. अशा ग्राहकांसाठी jio चा हा प्लॅन एकदम बेस्ट आहे.
केवळ 123 रूपयांच्या या रिचार्जमध्ये महिन्याभराचा रिचार्ज मिळणार आहे. म्हणजेच 28 दिवसांची वैधता मिळणार आहे. या सोबतच 28 दिवसांची वैधता. अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 500 MB डेटा आणि 300 MMSची सुविधा मिळते. म्हणजेच दिवसाला साधारण 4 रूपये 39 पैसे खर्च करून हा प्लॅन वापरता येतो.
123 रूपयांच्या प्लॅनमध्ये काय काय मिळणार : जिओच्या या प्लॅनची वैधता 28 दिवसांची आहे. या काळात ग्राहकांना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंगची सुविधा मिळते. इंटरनेट वापरण्यासाठी दररोज 500 mb high speed data दिला जातो. म्हणजेच 28 दिवसांत 14GB डेटा मिळतो. याशिवाय 300MMS ही मिळतात.
या प्लॅनमध्ये Jiotv आणि jio क्लाउडचा अॅक्सेसही दिला गेला आहे. त्यामुळे ग्राहकांना मोबाईलवर थेट टिव्हीवरील कार्यक्रम पाहता येणार आहे.
कोणासाठी हा प्लॅन फायदेशीर ठरू शकतो : ज्यांच्याकडे जिओफोन आहे आणि ज्यांना फक्त फोन कॉलसाठी रिचार्ज करायचा आहे. अशा लोकांसाठी हा प्लॅन एकदम बेस्ट आहे. कमी किमतीत कॉलिंग, डेटा आणि MMS यासाठी हा रिचार्ज फायद्याचा आहे.
मात्र, या प्लॅनबाबत एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यायला हवी. 123 रूपयांचाय हा रिचार्ज सर्व Jio ग्राहकांसाठी नाही. तो खास जिओफोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठीच उपलब्ध आहे. त्यामुळे हा स्मार्टफोन वापरणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला हा प्लॅन रिचार्ज करता येईलच असं नाही.
Source: TV9 Marathi Business






