Hashtagintro

Karnataka Lokayukta : विजापूरमध्ये कृषी संचालकांच्या घरावर छापे

विजापूर : विजापूर जिल्हा कृषी विभागाचे सहायक संचालक हुच्चप्पा शिंगेगोळ यांची निवासस्थाने, कार्यालय आणि फार्महाऊसवर विजापूर जिल्हा लोकायुक्त पोलिसांनी छापा टाकून कागदपत्रांची तपासणी सुरू केली आहे.

विजापूर शहरातील सुकून कॉलनी येथील निवासस्थान, चालुक्यनगर येथील निवासस्थान, हिट्टनळ्ळी येथील जिल्हा प्रशिक्षण केंद्रातील कार्यालय आणि देवर हिप्परगी तालुक्यातील पडगानूर येथील फार्महाऊस अशा एकूण 4 ठिकाणी लोकायुक्त अधिकाऱ्यांनी एकाच वेळी छापे टाकले.

लोकायुक्त पोलिस अधीक्षक महानिंग नंदगावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक आनंद टक्कण्णवर यांच्यासह लोकायुक्त पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. चारही ठिकाणी कागदपत्रांची कसून तपासणी सुरु आहे. रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती. तपासणी पूर्ण झाल्यानंतर छाप्याचा सविस्तर तपशील समोर येण्याची शक्यता आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language