Hashtagintro

Karnataka Teacher Recruitment : राज्यात १७ हजार शिक्षकांची भरती

बंगळूर : राज्याच्या इतिहासातील सर्वात मोठ्या शिक्षक भरती प्रक्रियेला सुरुवात झाली असून, १७ हजार शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ही भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण केली जाईल, अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी दिली.

शिमोगा जिल्ह्यातील सोरब विधानसभा मतदारसंघात विकासकामांचे भूमिपूजन केल्यानंतर ते बोलत होते. ते म्हणाले, विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षणासोबतच आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे सरकारचे उद्दिष्ट आहे. ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांनाही गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळाली पाहिजे, ही सरकारची भूमिका आहे.

राज्यात शिक्षकांची मोठ्या प्रमाणावर भरती करण्यासोबतच ग्रामीण भागातील शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मंत्र्यांनी सांगितले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language