प्रसिद्ध निर्माती एकता कपूर हिच्या दिवाळी पार्टीमध्ये अनेक सेलिब्रिटींची मांदियाळी पाहायला मिळाली. पण 'कसोटी जिंदगी की' मालेकीत मिस्टर बजाज आणि प्रेरणा यांच्यावर सर्वांच्या नजरा येऊन थांबल्या… दोघांचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
फोटोमध्ये रोनित रॉय अभिनेत्री श्वेता तिवारी हिला किस करताना दिसला. अभिनेत्याने स्वतः दिवाळी पार्टीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. अभिनेत्याने पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये मनीष पॉल देखील दिसत आहे.
दुसऱ्या एका फोटोमध्ये रोनित रॉयसोबत प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी, तिची बहीण शमिता शेट्टी आणि राज कुंद्रा दिसत देखील आहेत. दिवाळीबद्दल सर्वजण खूप आनंदी दिसत आहेत.
रोनित रॉयने मनीष मल्होत्रा यांच्यासोबतचा एक फोटोही शेअर केला आहे. हे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. चाहते या सर्व स्टार्सना दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत.
फोटो शेअर करताना रोनित रॉयने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, ” अबाउट लास्ट नाइट' असं काहीही झालं नाही, कारण लवकर निघावं लागलं. उद्या सकाळी लवकर काम आहे. दिवाळीच्या दिवशीही. चांगलं आहे ना… शुभ दिवशी शुभ वेळेचा शुभ वापर शुभ दिवाळी आणि शुभ रात्री. पहिला फोटो विशेषतः प्रेरणा-बजाजच्या चाहत्यांसाठी आहे.
Source: TV9 Marathi Entertainment





