Hashtagintro

Kendall Jenner: बिकीनीवर ओमचं वस्त्र गुंडाळलं, अभिनेत्रीकडून हिंदू धर्माचा अपमान, नेटकऱ्यांचा संताप

Kendall Jenner: बिकीनीवर ओमचं वस्त्र गुंडाळलं, अभिनेत्रीकडून हिंदू धर्माचा अपमान, नेटकऱ्यांचा संताप

Kendall Jenner Viral Photo: अमेरिकन मॉडेल केंडल जेनर वादात सापडली आहे. ३१ वर्षीय केंडलने तिच्या स्विमवेअरवर ‘ओम’ चिन्ह असलेले वस्त्र परिधान केल्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये केंडलने तिच्या स्विमवेअरवर ‘ओम’ चिन्ह छापलेले वस्त्र परिधान केले आहे. यूजर आता तिच्यावर जोरदार टीका करत आहेत. अनेकांनी याला हिंदू धर्माचा अपमान म्हटले आहे. त्यांच्या मते, ‘ओम’ हे एक धार्मिक चिन्ह आहे आणि बीचवेअर म्हणून त्याचा अशा प्रकारे वापर करणे लज्जास्पद आहे.

केंडल जेनर तिची बहीण कायली जेनरसोबत हेली बीबरचा ३० वा वाढदिवस साजरा करण्यासाठी बहामासला गेली होती. याचदरम्यान, तिने तिच्या स्विमवेअरवर ‘ओम’ चिन्ह असलेले वस्त्र परिधान केल्याचे फोटो समोर आले. कायली जेनरने शेअर केलेल्या एका फोटोमध्ये, दोन्ही बहिणी एकमेकींना मिठी मारताना दिसत आहेत, तर दुसऱ्या फोटोमध्ये त्या समुद्रासमोर पोज देत आहेत. केंडलने काळ्या रंगाची टू-पीस बिकिनी घातली असून, तिच्या कमरेभोवती ‘ओम’ चिन्ह छापलेला पिवळ्या आणि लाल रंगाचा कापड गुंडाळलेला आहे. कायलीने व्ही-नेकलाइन आणि शीअर डिझाइन असलेला फिटिंगचा काळ्या रंगाचा मिडी ड्रेस घातला आहे. सोशल मीडियावर अनेक भारतीय युझर्सनी फॅशन म्हणून धार्मिक चिन्हाच्या वापराला आक्षेप घेतला असून, याला हिंदू श्रद्धा आणि परंपरांचा अपमान म्हटले आहे.

केंडल जेनर एक अमेरिकन मॉडेल आणि टेलिव्हिजन सेलिब्रिटी आहे. ‘कीपिंग अप विथ द कार्दशियन्स’ या शोमुळे तिला लोकप्रियता मिळाली. ती २००७ ते २०२१ या जवळपास १५ वर्षांच्या कालावधीत, रिॲलिटी मालिकेच्या २० सीझनमध्ये दिसली. ती ‘कोर्टनी अँड क्लो टेक मायामी’ (२००९), ‘कोर्टनी अँड किम टेक न्यूयॉर्क’ (२०११), ‘क्लो अँड लामार’ (२०११), ‘रॉब अँड चायना’ (२०१६), आणि ‘लाइफ ऑफ कायली’ (२०१७) यांसारख्या अनेक स्पिन-ऑफमध्येही दिसली आहे.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language