Hashtagintro

kolhapur | ‘शिवशस्त्र शौर्यगाथा-वाघनखं’ प्रदर्शनाचा आज अखेरचा दिवस

कोल्हापूर : ‘रयतेचे स्वतंत्र-सार्वभौम स्वराज्य नष्ट करण्यासाठी आलेल्या आदिलशहाचा सेनापती अफजल खानाला शिवछत्रपतींनी ज्या वाघनखांच्या सहाय्याने मारले ती पाहून आम्ही धन्य झालो…, शिवशस्त्र शौर्यगाथा वाघनख प्रदर्शनातून अविस्मरणीय क्षण आमच्यापर्यंत पोहोचविल्याबद्दल महाराष्ट्र शासनाचे विशेष आभार…, या व अशा अभिप्रायातून कोल्हापुरातील लक्ष्मी विलास पॅलेस येथे भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित झाले.

महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालये संचालनालयाच्या वतीने कसबा बावडा येथील शाहू जन्मस्थळ (लक्ष्मी विलास पॅलेस) येथे शिवशस्त्र शौर्यगाथा-वाघनखं प्रदर्शन गेली १३ महिने सुरू होते. याचा लाभ तब्बल १ लाख ७५ हजार इतिहासप्रेमी, अबालवृद्ध नागरिकांनी घेतला. रविवारी (दि.१) प्रदर्शनाचा अखेरचा दिवस आहे. १३ महिने सुरू असणाऱ्या या प्रदर्शनाचा लाभ जिल्ह्यातील विविध शाळा-महाविद्यालये, राज्य आणि देशभरातून आलेले पर्यटक यांनी आवर्जून घेतला. प्रदर्शनात इंग्लंड येथील ब्रिटिश वस्तुसंग्रहालयात शिवरायांची वाघनखे विशेष सुरक्षित एसी दालनात बंद काचेतून पाहण्यास ठेवण्यात आली होती.

शिवकालीन शस्त्रास्त्रे कायमस्वरूपी राहणार

प्रदर्शनात वाघनखांबरोबरच कोल्हापूरचे सुपुत्र शिवकालीन शस्त्रास्त्र संग्राहक कै. गिरीश लक्ष्मण जाधव (रा. जयसिंगपूर) यांनी आपली संपूर्ण हयात खर्च करून संकलित केलेली शेकडो शिवकालीन शस्त्रास्त्रे मांडण्यात आली आहेत. यात वाघनख, बिचवा, तलवार, पट्टा, विटा, बाणा, भाला, धनुष्य-बाण, गुर्ज, कट्यार, ठाचणीची बंदूक, जिरेटोप, चिलखत अशी शिवकालीन शस्त्रास्त्रे आणि लढाई संबंधित दुर्मीळ वस्तूंचा समावेश आहे. ही शस्त्रास्त्रे कायमस्वरूपी लक्ष्मी विलास पॅलेस येथे पाहण्यास खुली राहणार असल्याची माहिती संग्रहालयाचे अधीक्षक उदय सुर्वे यांनी दिली.

शाहू जन्मस्थळ सोमवार वगळता नियमित सुरू

शिवशस्त्र शौर्यगाथा प्रदर्शनाची सांगता झाल्यानंतर राज्य संरक्षित स्मारक असलेले राजर्षी छत्रपती शाहू महाराज जन्मस्थळ संग्रहालय, लक्ष्मी विलास पॅलेस हे नियमानुसार दर सोमवारी बंद राहील आणि सोमवारवगळता इतर दिवशी सर्व पर्यटकांसाठी नियमितपणे खुले राहणार असल्याची माहिती संग्रहालयाचे उत्तम कांबळे यांनी दिली.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language