Hashtagintro

Kolhapur Crime : पाच टोळ्या, ३७ जणांना ‘मोका’, १० महिन्यांत पोलिसांचा दणका

आशिष आडिवरेकर

कोल्हापूर : शहरासह जिल्ह्यात गुन्हेगारी कारवायांनी दहशत निर्माण करणाऱ्या सराईत गुंडांच्या ५ टोळ्यांवर गेल्या १० महिन्यांत कोल्हापूर पोलिसांनी ‘मोका’ अंतर्गत कारवाई केली आहे. या टोळ्यांतील ३७ जणांवर गुन्हा दाखल करून ३२ जणांना अटक केली आहे. ५ जण अद्यापही पसार असून त्यांचा शोध सुरू आहे. गतवर्षीपेक्षा यंदा ‘मोका’ कारवाईत दुपटीने वाढ झाली आहे.

गर्भलिंग निदान प्रकरणातील पाचजणांचा शोध सुरू

गर्भलिंग निदान आणि गर्भपात करणाऱ्या स्वप्नील पाटील टोळीवर करवीर पोलिसांनी ‘मोका’अंतर्गत कारवाई केली. यामधील पाच आरोपी अद्यापही पसार आहेत. पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. डॉ. सोनल वालावलकर, मदुराई येथील मशिन पुरवठा करणारा मशिन विक्रेता, मेडिकल व्यावसायिक यांचा समावेश आहे.

पोलिस स्टेशननिहाय आकडेवारी

राजारामपुरी – ३ (गेंड्या, गवळी, दम मारो दम गँग)

करवीर – एक (गर्भलिंग : स्वप्नील पाटील टोळी)

जुना राजवाडा – एक (गोल्डन हंटर्स)

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language