Hashtagintro

Kolhapur Drought Survey| करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज, कागल तालुक्यांचे होणार सर्वेक्षण

मुंबई : राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीत वाढ होत असून, चिपळूण, दिंडोरी, वाडा आणि विक्रमगड हे चार तालुके दुष्काळग्रस्त यादीत समाविष्ट करण्यात येणार आहेत. तर, आणखी ९ तालुक्यांचे ग्राऊंड सर्वेक्षण करण्याचे आदेश महसूलमंत्री तथा दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी (दि. १७) दिले. यामध्‍ये कोल्‍हापुरातील करवीर, हातकणंगले, गडहिंग्लज आणि कागल या तालुक्‍यांचा समावेश आहे.

राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणीटंचाई निवारण, जलजीवन मिशनची अपूर्ण कामे आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात पार पडली. उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह या बैठकीला मंत्री प्रताप सरनाईक, मंत्री दत्तात्रय भरणे, मंत्री नितेश राणे, मंत्री संजय राठोड आणि मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते.

आजपासून सर्वेक्षण सुरू : जिल्हाधिकारी

दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होत असलेल्या हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, करवीर या तालुक्यांचे बुधवार (दि. १८) पासून सर्वेक्षण केले जाणार आहे. याबाबतचा अहवाल येत्या मंगळवारी (दि. २४) होणार्‍या दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीच्‍या बैठकीपूर्वी सादर केला जाईल, असे जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी सांगितले.

दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत हातकणंगले, गडहिंग्लज, कागल, करवीर यासह अन्य तालुक्यांचे निकषांनुसार सर्वेक्षण करून पुढील बैठकीत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. हे आदेश बुधवारपर्यंत प्राप्त होतील, असे सांगत या तालुक्यांचे वस्तुनिष्ठ पंचनामे करून अहवाल तयार करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. बुधवारपासून हे काम सुरू होईल, असे डॉ. राठोड यांनी सांगितले.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language