मराठी सिनेसृष्टीतील दिग्दर्शिका आणि अभिनेत्री क्रांती रेडकर सध्या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आली आहे. मैत्रेया हा तिचा सिनेमा आगामी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. आता या सिनेमाच्या प्रमोशन कार्यक्रमा दरम्यान तिनं एक विधान केले आहे.
एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत क्रांती रेडकरला विचारण्यात आले की, समीर वानखेडेच्या कामाच्या पद्धतीवरुन तुझ्या करिअरवर परिणाम झाला आहे का? यावर ती म्हणाली की, हे झालाय ना, हिंदी सिनेसृष्टीत मला काम मिळत नाहीये. डायरेक्टर असो लेखक असो तिथल्या स्टुडिओंना माझ्यासोबत काम करायचे नाहीये.
प्रसिद्ध हिंदी सिनेसृष्टीतील एका अभिनेत्रीला माझ्यासोबत काम करायचे होते, तिने बऱ्याच स्टुडिओमध्ये माझ्याबद्दल माहिती दिली. मला समोरुन क्लिअरली येत होतं की, आम्हाला त्या चित्रपटाचा भाग व्हायचं नाहीये जिथे समीर वानखेडेचे नाव असेल.” असं क्रांतीने बोलून दाखवलं.
हिंदी सिनेसृष्टीत माझी माणसं नसली तरीही मराठी सिनेसृष्टीत माझी खूप माणसं आहेत, आपल्या मराठी सिनेसृष्टीत मला मदत करणारी खूप माणसं आहेत, मराठीतील कोणत्याही चॅनेसल्सला या गोष्टीचा फरक पडत नाही.” असं क्रांतीने यावेळी बोलून दाखवले.
माझ्यापाठीमागे ज्या पद्धतीने आपले मराठी प्रेक्षक ठामपणे उभे असतात, किंवा कलाकार ज्या पद्धतीने मला मदत करतात. त्यांचे खरोखरच कौतुक करावेसे वाटते, असं क्रांती रेडकरने बोलली.
Source: TV9 Marathi Entertainment





