Hashtagintro

Latur Drought | शिरूर अनंतपाळ तालुक्यात दुष्काळाची भीषणता: पाण्याच्या टंचाईमुळे वन्यप्राणी मानवी वस्तीकडे

Shirur Anantpal Drought

शिरूर अनंतपाळ : शिरूर अनंतपाळ तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण अत्यंत कमी राहिल्याने तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. विहिरी, तलाव, नाले आणि इतर प्रमुख जलस्रोत आटल्यामुळे जलसाठ्यामध्ये कमालीची घट झाली आहे. या भीषण पाणीटंचाईचा फटका नागरिकांसोबतच पशुधन, पक्षी आणि वन्य प्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात बसत आहे.

जंगलातील आणि ग्रामीण भागातील नैसर्गिक जलस्रोत कोरडे पडल्यामुळे पाणी शोधण्यासाठी वन्यप्राणी व पक्षी मानवी वस्तीकडे धाव घेत आहेत. यामुळे त्यांच्या जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे. या समस्येचे गांभीर्य ओळखून प्रशासनाने तात्काळ पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात डोंगरगाव, आरी ,उजेड, उंबरदरा या गावात पाण्याची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. तरी शासकीय यंत्रणेमार्फत कृत्रिम पाणवठे अथवा पाणी साठवण टाक्या तयार कराव्यात , अशी मागणी केली जात आहे. केवळ पाणवठे तयार करून न थांबता त्यामध्ये नियमित पाणी भरण्याची आणि उपलब्धतेची योग्य व्यवस्था करणे अत्यंत आवश्यक आहे.

शिरूर अनंतपाळ तालुक्यात गंभीर दुष्काळी परिस्थितीची दखल घेऊन प्रशासनाने योग्य ठिकाणांची पाहणी करावी. पशु-पक्षी आणि वन्य प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय करण्यासाठी आवश्यकता आहे.या विषयाकडे केवळ प्रशासकीय बाब म्हणून न पाहता मानवीय आणि पर्यावरणीय दृष्टिकोनातून प्राधान्य देऊन तात्काळ अंमलबजावणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून व शेतकऱ्यांकडून केली जात आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language