Hashtagintro

Long Hair: दर महिन्याला केस कापल्यास भराभर वाढतात? दाट केसांसाठी किती दिवसांनी कापावे? काय सांगतं विज्ञान?

Long Hair: दर महिन्याला केस कापल्यास भराभर वाढतात? दाट केसांसाठी किती दिवसांनी कापावे? काय सांगतं विज्ञान?

Long Hair Growth: दर महिन्याला केस कापल्याने ते दाट आणि लांबसडक होतात असा समज अनेकदा पाहायला मिळतो. केस कापल्याने खरंच ते झटपट वाढतात का? लांब केसासाठी किती दिवसांनी केस कापावेत, याविषयी तज्ज्ञांचे मत आणि विज्ञान काय आहे? केसांच्या वाढीबद्दल विज्ञान काय सांगते. केसांचे आरोग्य जपण्यासाठी काय करणए फायद्याचे ठरते, ते जाणून घेऊयात.

दरमहा किती होते केसांची वाढ?

टाळूच्या त्वचेखालील केसांच्या मुळावर केसांची वाढ अवलंबून असते. केसांचा जो भाग आपण कापतो, तो मृत पेशींपासून तयार झालेला असतो. यामुळे खालून केस कापल्याने मुळाच्या वाढीचा वेग बदलत नाही. साधारणपणे दर महिन्याला माणसाच्या डोक्यावरील केसची वाढ अर्धा इंच होते, असे मानले जाते. अर्थात केसांची ही वाढ अनुवांशिकता, वय, पोषण, होर्मोनल समतोल, ताणतणाव आणि केसांचे आरोग्य यावर अवलंबून असते.

केस कापल्याने काय होतो फायदा?

केस कापल्याचा त्याच्या वाढीशी काहीही संबंध नसते. केसांची गुणवत्ता आणि आरोग्य सुधारण्यासाठी केस कापण्याचा फायदा होतो. केसांचे टोक फाटणे अथवा कोरडेपणा, ते तुटण्याची समस्या वाढल्यास केस खालून तुटतात. ज्यामुळे केसांची लांबी वाढत नाही. ते विरळ दिसतात. नियमित अंतराने टोकाकडील खराब झालेले. टोक फाटलेले केस कापल्यास केसांची तुटणे थांबते. केसांना अधिक स्वच्छ, निरोगी ठेवणे आवश्यक आहे. लांब केस हवे असतील तर दर महिन्याला कापणे चांगले ठरणार नाही. पण जर केसांना फाटे फुटत असतील तर खालच्या बाजूला ते किंचित कापणे योग्य ठरू शकते. काहींच्या मते, दोन ते तीन महिन्यातून केस कापणे केसांच्या आरोग्यासाठी चांगले ठरू शकते. पण जर अनेक दिवस जर केस कापले नाही तर गुंता वाढू शकतो. फाटे फुटत असलेले केस वाढू शकतात. केस विंचरण्यात मोठी अडचण ठरू शकते. खराब केस कापल्यास केसांची गुणवत्ता सुधारते. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी पौष्टिक पदार्थांवर अधिक भर देणे आवश्यक आहे. सोबतच पाचन शक्ती चांगली असणेही महत्त्वाचे आहे.

डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती आहे. केसांची रचना आणि पोत वेगळा असतो. कोणत्याही उपचारापूर्वी वैद्यकीय तज्ज्ञाचा सल्ला आवश्य घ्या.)

Source: TV9 Marathi Health

Read full article on TV9 Marathi Health

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language