Hashtagintro

Maharashtra News LIVE : टोरंट प्रकल्प आणि वृक्षतोडीविरोधात आज कर्जत तालुका बंदची हाक

Maharashtra News LIVE : टोरंट प्रकल्प आणि वृक्षतोडीविरोधात आज कर्जत तालुका बंदची हाक

टोरंट प्रकल्प आणि वृक्षतोडीविरोधात आज कर्जत तालुका बंदची हाक पुकारण्यात आली आहे. साईडोंगर जंगल वाचवण्यासाठी कर्जतकर एकवटणार आहेत. जंगलतोडीविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाले असून भीमाशंकर, साईडोंगर परिसरातील जंगलतोडीविरोधात कर्जतकरांचा एल्गार आता पाहायला मिळणार आहे. जंगल वाचवा, निसर्ग वाचवा’चा नारा देत आज कर्जत तालुका बंद असणार आहे. तर कल्याण येथून देखील धक्कादायक माहिती समोर येत आहे. कल्याण पूर्वेत मध्यरात्री तोंडावर कपडा बांधून संशयितांनी कारमधून रेकी केल्याची माहिती समोर येत आहे. गोपाळ कृष्ण नगरमधील परिसराची घटना CCTV मध्ये कैद झाली. पहाटे साडेतीन वाजता कारमधून आलेल्या व्यक्तींकडून दोन सदनिकांची पाहणी करण्यात आली. पोलिसांकडून कारचा शोध सुरू असून व्यक्तींची ओळख आणि येण्यामागचा हेतू तपासणार आहेत.

दुष्काळग्रस्त भागात देखील परिस्थिती गंभीर आहे. शरद पवार दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार, तर पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडून दुष्काळग्रस्तांना दिवाळी किटचे वाटप करण्यात येणार आहे. शरद पवार आज दुपारी ४ वाजता परंडा आणि धाराशिव तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी करणार. धाराशिव येथे मुक्काम करणार असून उद्या कळंब तालुक्यात पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यासहित जगासहित देशातील विविध घडामोडी जाणून घ्या.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language