Hashtagintro

Mahesh Tilekar : मी तिला शालजोडे दिले, तुमची दानत…महेश टिळेकरांनी सांगितला मराठी अभिनेत्रीचा कटू अनुभव, काय घडलेलं?

Mahesh Tilekar : मी तिला शालजोडे दिले, तुमची दानत…महेश टिळेकरांनी सांगितला मराठी अभिनेत्रीचा कटू अनुभव, काय घडलेलं?

प्रसिद्ध मराठी दिग्दर्शक आणि निर्माते महेश टिळेकर स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. अनेक मुलाखतींमध्ये ते इंडस्ट्रीतील अनुभव शेअर करतात. अशातच एका मुलाखतीत महेश टिळेकर यांनी एका मराठी अभिनेत्रीचा अनुभव शेअर केलेला. मराठी कलाकारांना मुंबईत हक्काचं घर मिळावं यासाठी टिळेकरांनी खूप प्रयत्न केले. काही कलाकारांना सरकारी कोट्यातून कमी किमतीत मुंबईत चांगल्या ठिकाणी घरं मिळाली होती. एका मराठी अभिनेत्रीला टिळेकरांनी घर मिळवून दिलेलं, पण नंतर तिनं ते न सांगता विकलं. याबद्दल महेश यांनी मुलाखतीत सांगितलं आहे.

महेश टिळेकर यांनी सांगितला प्रसंग

महेश टिळेकर म्हणाले की, ‘आता एक अभिनेत्री सरकारी अधिकाऱ्याची पत्नी आहे, तिला त्यावेळी आमच्या एका सहकाऱ्याचा फ्लॅट मी मिळवून दिलेला. तिला तोच फ्लॅट हवा होता, कारण तो तिचा लकी नंबर आहे. खरंतर, तिनं तो फ्लॅट पाच वर्षांत विकला. म्हणजे, तिला या सगळ्याची खरी गरजच नव्हती. तिथे तिला भेटायला तिचे वेगवेगळे मित्र यायचे. पाच वर्षांनी जेव्हा तिनं तो फ्लॅट विकला, तेव्हा ज्या सहकाऱ्याचा फ्लॅट तिनं बदलून घेतला होता, त्याला फोन करून तिनं निदान कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे होती. मग माणूस चिडणार की नाही? मग मला जे काही शालजोडे द्यायचे होते ते दिले.’

‘त्या बॅकस्टेज आर्टिस्टनं केवळ माझ्या सांगण्यावरून तिला तो फ्लॅट बदलून दिला होता. त्या फ्लॅटचा व्ह्यू खूप छान होता. हे तिला बरोबर माहिती होतं. पुढे, फ्लॅट विकल्यावर त्या अभिनेत्रीला व्ह्यूमुळे सुद्धा जास्त पैसे मिळाले होते. आता तुम्ही सोशल मीडियावर सक्रिय असता, आम्ही असं केलं वगैरे. कशाला हा खोटेपणा? तुमची दानत तिथेच दिसली ना. मग मला म्हणाली, मी त्याला चांदीचं निरांजन देते. अरे काय चांदीचं निरांजन? तेव्हा ५२ लाखांना ते फ्लॅट मिळाले होते. विकताना त्या फ्लॅटची किंमत दीड कोटींच्या पुढे होती.’

‘यामुळे जे खरंच गरजू कलाकार आहेत, ते मागे राहतात.’ असं महेश टिळेकर शेवटी म्हणाले. ‘राजश्री मराठी‘ला दिलेल्या मुलाखतीत महेश टिळेकर बोलत होते.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language