मैने प्यार किया हा बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट आहे. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. तसेच या चित्रपटाने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं घर केलं आहे. या चित्रपटाच्या सेटवरचा एक भन्नाट किस्सा समोर आला आहे.
या चित्रपटाच्या माध्यमातून अभिनेत्री भाग्यश्रीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. तिने या सिनेमात अभिनेता सलमान खानसोबत भूमिका साकारली. आता निर्माता मेहमूद अली यांनी एका पॉडकास्टमध्ये सेटवरचा भन्नाट किस्सा सांगितला आहे.
मेहमूद अली म्हणाले की, मैने प्यार किया या सिनेमाच्या वेळी भाग्यश्रीचे हिमालयसोबत लग्न जमले होते. तो दररोज तिच्यासोबत सेटवर यायचा. इतका जवळ सीन शूट करु नका, इथे हात लावू नका, मिठी का मारायची आहे? असे करु नका, तसे करु नका असं करायचं.
सलमान म्हणाला अरे याचं काही तरी करावं लागेल. तेव्हा जमालगोटा असायचा जो जुलाब होण्यासाठी वापरला जायचा. तो फक्त रेल्वे स्टेशनवर मिळायचा. आम्ही वांद्रे स्थानकातून तो जमालगोटा विकत आणला आणि हिमालयचा खाण्यात टाकला. भाईला जुलाब सुरु झाले. दोन दिवस गायब झाला. त्यानंतर सगळे रोमँटिक सीन शूट करण्यात आले असे मेहमूद अली म्हणाले.
मैने प्यार किया हा चित्रपट 29 डिसेंबर 1989 प्रदर्शित झाला होता. त्यावेळी या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली होती. या चित्रपटातून भाग्यश्री रातोरात स्टार झाली होती.
Source: TV9 Marathi Entertainment





