Hashtagintro

Manoj Muntashir: मनोज मुंतशिर यांचा तरुणांना खास संदेश; एआयवरही मांडलं स्पष्ट मत

मुंबई पुस्तक महोत्सवात प्रसिद्ध गीतकार आणि लेखक मनोज मुंतशिर यांनी तरुणांना विचारात खोली आणण्याचा खास संदेश दिला. एका परिसंवादात बोलताना मनोज मुंतशिर म्हणाले, “तरुणांमध्ये जितकी गती आहे, त्याच्या दुप्पट खोली त्यांच्या विचारांमध्ये असायला हवी. हेच माझं स्वप्न आहे.” नव्या पिढीच्या बुद्धिमत्तेचं आणि समजूतदारपणाचं त्यांनी कौतुक केलं. आजची पिढी भावना व्यक्त करण्याच्या पद्धतीत बदलली आहे, असं ते म्हणाले. ती कदाचित कमी बोलत असेल, पण तिच्या भावना तितक्याच खोल आणि तीव्र आहेत.भारतीय संस्कृतीतील रामलीला आणि कृष्णलीलेच्या समृद्ध परंपरेचा उल्लेख करत मुंतशिर यांनी भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित भव्य नाट्यप्रस्तुती तयार करण्यामागचा विचार सांगितला.
भारतीय कथा जगातील इतर कोणत्याही कथांपेक्षा कमी नाहीत. त्यांनाही जागतिक स्तरावर भव्य आणि प्रभावी पद्धतीने सादर करता येऊ शकतं, असं त्यांनी नमूद केलं.पुस्तकांशी जोडले जाण्याचं आवाहन करत मनोज मुंतशिर म्हणाले, वाचनामुळे माणूस अधिक संवेदनशील आणि समजूतदार बनतो. त्यामुळे प्रत्येकाने अधिकाधिक पुस्तकं वाचली पाहिजेत. कविता ही परमेश्वराची प्रेरणा आहे, कवी केवळ माध्यम असतो, असं सांगत विविध भाषांमधील श्रेष्ठ कवी आणि कवयित्रींचं साहित्य वाचावं, असं आवाहनही त्यांनी केलं.एआय कितीही पुढे गेलं तरी मानवी प्रेम आणि भावनांची जागा कोणीही घेऊ शकणार नाही, हाच त्यांच्या बोलण्याचा मुख्य सूर होता.
https://www.prahaar.in/2026/11/26/loc-issued-against-three-cjp-office-bearers-in-connection-with-a-protest-on-gandhi-jayanti/
दरम्यान, याच महोत्सवात ज्येष्ठ वकील आणि राज्यसभा खासदार उज्ज्वल निकम यांनीही 26/11 खटल्यातील काही न ऐकलेले किस्से सांगितले. कसाबला फाशी मिळवणं हाच उद्देश नव्हता, तर पाकिस्तानात रचलेल्या कटाचा पर्दाफाश करणं हाच खरा उद्देश होता, असं ते म्हणाले. त्यांनी सांगितलं, हल्ल्याच्या वेळी पाकिस्तानातील कराचीत एक कंट्रोल रूम बनवण्यात आली होती. तिथून मुंबईत हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना सतत सूचना दिल्या जात होत्या. दहशतवादी आणि कराचीत बसलेल्या सूत्रधारांमधल्या बोलण्याच्या नोंदीही उपलब्ध आहेत. त्या सूत्रधारांविरोधात आता कायदेशीर कारवाई सुरू केली असून त्याचे परिणाम लवकरच दिसतील, असा विश्वास निकम यांनी व्यक्त केला.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language