Hashtagintro

Mithun Chakraborty And Sridevi Affair : दर 15 मिनिटांनी फोन अन् मेकअप रूममध्ये…मिथुन आणि श्रीदेवी यांच्या अफेअरबद्दल दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

Mithun Chakraborty And Sridevi Affair : दर 15 मिनिटांनी फोन अन् मेकअप रूममध्ये…मिथुन आणि श्रीदेवी यांच्या अफेअरबद्दल दिग्दर्शकाचा मोठा खुलासा

बॉलिवूडमध्ये अशा अनेक लव्हस्टोरी आहेत ज्यांची आजही चर्चा होते. अशीच एक कथा म्हणजे मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांच्यातील अफेअर. 1980 च्या दशकात मिथुन आणि श्रीदेवी यांच्या अफेअरची चर्चा झाली. मात्र, त्या दोघांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीही उघडपणे चर्चा केली नाही. आता, प्रसिद्ध बॉलिवूड सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक लॉरेन्स डिसूझा यांनी एका मुलाखतीत मिथुन आणि श्रीदेवी यांच्या नात्याबद्दल भाष्य केलं आहे.

लॉरेन्स डिसूझा यांचा मोठा खुलासा

लॉरेन्स डिसूझा यांनी सिद्धार्थ कन्नन यांना दिलेल्या एका मुलाखतीत मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांच्या नात्याबद्दल सांगितलं. त्यांनी सांगितलं की, त्यावेळी मिथुन विवाहित होते. असं असूनही, श्रीदेवी यांच्यासोबतचं मिथुन यांचं नातं हा सेटवर चर्चेचा विषय होता. लॉरेन्स यांनी सांगितलं की, शूटिंगदरम्यान श्रीदेवी दर 15 मिनिटांनी मिथुन यांच्याशी फोनवर बोलण्यासाठी सेट सोडून जायच्या.

लॉरेन्स डिसोझा म्हणाले, ‘मिथुनचा फोन दर 15 मिनिटांनी यायचा आणि श्रीदेवी सतत त्याच्याकडे धावत जायची. ती 10-15 मिनिटांचा शॉट देऊन मग फोनवर बोलण्यासाठी निघून जायची. मिथुनसुद्धा वारंवार सेटवर यायचे. तो मेकअप रूममध्ये तिची वाट बघायचा. श्रीदेवी मिथुनच्या प्रेमात होती. त्यावेळी मिथुनचं लग्न योगिता बालीशी झालं होतं.’

‘मिथुन कधीकधी संध्याकाळी पॅक-अपच्या वेळी किंवा शूटिंग चालू असताना सेटवर यायचा. तो श्रीदेवीच्या मेकअप रूममध्ये बसून तिची वाट बघायचा. शूटिंग संपल्यावर ते अनेकदा एकत्र निघून जायचे.’ असंही लॉरेन्स यांनी सांगितलं.

दरम्यान, मिथुन चक्रवर्ती आणि श्रीदेवी यांनी 1984 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘जाग उठा इंसान’ या चित्रपटात एकत्र काम केलं. या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मिथुन आणि श्रीदेवी यांच्यातील जवळीक वाढली. अनेक माध्यमांच्या वृत्तांमध्ये असा दावा करण्यात आला होता की, दोघांनी 1985 मध्ये कोर्ट मॅरेज केलं होतं. पण, मिथुन आणि श्रीदेवी यांनी याबद्दल कधीही काहीही सांगितलं नाही, किंवा त्यांनी त्यांच्या नात्याबद्दल उघडपणे भाष्यही केलं नाही.

1987 मध्ये एका मुलाखतीदरम्यान, मिथुन यांना त्यांच्या अफेअर्सबद्दल प्रश्न विचारण्यात आला. वर्तमानपत्रांतील वृत्तांमध्ये किती तथ्य आहे, असं त्यांना विचारण्यात आलं. यावर मिथुन म्हणाले की, ‘हो, यातील काही गोष्टी खऱ्या आहेत आणि काही खोट्या. मला काहीही बोलायचं नाही. तुम्ही मला विवाहित अविवाहित म्हणू शकता.’

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language