Mohammed Siraj NZ vs IND: न्यूझीलंड आणि भारत यांच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्याच दिवशी चांगल्या सुरूवातीनंतरही भारतानं सामन्यावरील आपली पकड गमावली. किवींची अवस्था ५ बाद ७० धावा केल्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या सत्रात भारतीय गोलंदाजांना न्यूझीलंडच्या हेन्री निकोल्स आणि ग्लेन फिलिप्स यांनी चांगलेच दमवले. दिवस अखेर न्यूझीलंडने ५ बाद २४३ धावांपर्यंत मजल मारली.
पहिल्या कसोटीत संधी मिळायला हवी होती
भारतीय गोलंदाजांची सुमार कामगिरी पाहून भारताचे माजी कर्णधार आणि समालोचक सुनिल गावसकर यांनी टीका केली आहे. पहिल्या सामन्यात मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आलेला नाही. सिराजला ड्रॉप करण्याच्या निर्णयावर सुनिल गावसकर यांनी टीका करत सिराजने कोणतीही खराब कामगिरी केलेली नाही. तरीही त्याला बाहेर बसवण्यात आलं असं मत व्यक्त केलं.
सुनिल गावसकर यांनी वेलिंगटनमध्ये भारताने नाणेफेक जिंकल्यावर सोनी स्पोर्स्ट्सशी बोलताना, ‘मला वाटतं की शेवटची वनडे खेळल्यानंतर त्याला कसोटीत संधी मिळालयला हवी होती. मात्र हा निर्णय आश्चर्य चकीत करणारा आहे. मला वाटतं की त्याने कधीही भारताला निराश केलेलं नाही.’ अस वक्तव्य करून सिराजवर विश्वास दर्शवला होता.
सिराज उपलब्ध होता
सुनिल गावसकर यांनी अंशुल कम्बोज आणि प्रसिद्ध कृष्णा यांना सिराजच्या आधी संधी मिळण्यावर देखील प्रश्न उपस्थित केला. कम्बोजने २०२५ मध्ये कसोटी पदार्पण केलं. अन् कृष्णाने २०२३ मध्ये आपला पहिला कसोटी सामना खेळला आहे. याची आठवण गावसकर यांनी करून दिली.
गावसकर पुढे म्हणाले, ‘आपल्याकडे मोहम्मद सिराज सारखा अनुभवी गोलंदाज उपलब्ध होता. मात्र तुम्ही त्याची निवड केली नाही. मला सिराजला आघाडीच्या ४ वेगवान गोलंदाजांमध्ये का सामील करण्यात आलं नाही हे समजत नाहीये.’
गोलंदाजांची कामगिरी फक्त इकॉनॉमी रेट आणि चेंडू स्विंग करण्याच्या आधारावर मोजणे योग्य नाही. सुरूवातीच्या सत्रात जर भारताला पाठोपाठ विकेट घेता आल्या असत्या तर आज भारताची स्थिती वेगळी असती.
Source: Pudhari News
