Hashtagintro

Mohit Ulva: पाकविरुद्ध शेवटच्या बॉलवर मॅच जिंकवणाऱ्या मोहित उल्वाला मिळाली मोठी गुडन्यूज, काही मिनिटांतच थेट संघात एन्ट्री

Mohit Ulva: पाकविरुद्ध शेवटच्या बॉलवर मॅच जिंकवणाऱ्या मोहित उल्वाला मिळाली मोठी गुडन्यूज, काही मिनिटांतच थेट संघात एन्ट्री

IND vs PAK U19 Mens Asia Cup Final Match 2026: अंडर-१९ आशिया कप २०२६ मध्ये पाकिस्तानविरुद्ध सामना जिंकून देणारी खेळी करून भारताला विजय मिळवून दिल्याच्या काही तासांतच, १८ वर्षीय मोहित उल्वाला एक मोठे बक्षीस मिळाले आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने (SCA) सध्या सुरू असलेल्या देशांतर्गत टी-२० स्पर्धा, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीसाठी त्याला सौराष्ट्रच्या वरिष्ठ संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी ओमानमध्ये झालेल्या अंतिम सामन्यातील त्याच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन, असोसिएशनने त्याला तात्काळ इंदूरला पोहोचून संघात सामील होण्याचे निर्देश दिले आहेत.

सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयदेव शाह क्रिकबझ’शी बोलताना म्हणाले की, “मोहितने अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत उल्लेखनीय लवचिकता आणि संयम दाखवला आहे. या पार्श्वभूमीवर, SCA ने त्याला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी संघात समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे आणि त्याला ओमानहून थेट इंदूरला विमानाने सौराष्ट्र संघात सामील होण्यास सांगितले आहे. मोहित राजकोटजवळील सुरेंद्रनगर येथील एका सामान्य कुटुंबातील असून तो सध्या राजकोटमध्ये राहतो. आम्ही नेहमीच तरुण प्रतिभेला प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्नशील असतो आणि मोहितच्या सहभागामुळे सौराष्ट्र टी२० संघाला मोठी चालना मिळेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Cricbuzz (@cricbuzz)

मोहित उल्वाने आपल्या कारकिर्दीतील सर्वात संस्मरणीय खेळी अंडर-१९ आशिया कपच्या अंतिम सामन्यात खेळून भारताला पाकिस्तानविरुद्ध ३३८ धावांचे मोठे लक्ष्य गाठून दिले. सलामीवीर लक्ष्य रायचंदानी (८०) आणि आर्यवीर सेहवाग (५८) यांच्यातील ९५ धावांच्या भागीदारीनंतर भारतीय मधली फळी अपयशी ठरली आणि ४२ व्या षटकात ८ गडी बाद २५२ धावांवर संघ पराभवाच्या उंबरठ्यावर होता.

या निर्णायक क्षणी, मोहित उल्वा आणि मनाल चौहान (३२ चेंडूंत ४७ धावा) सोबत नवव्या विकेटसाठी ५७ धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली.  मनाल बाद झाल्यानंतर, भारताला एक गडी शिल्लक असताना ३६ धावांची गरज होती. मोहितने, ११ व्या क्रमांकावरील फलंदाज सी. व्यंकट (८ चेंडूंत ११* धावा) याच्या साथीने सामना शेवटच्या षटकापर्यंत नेला. शेवटच्या चेंडूवर तीन धावांची गरज असताना, मोहितने पाकिस्तानी लेग-स्पिनर अहमद हुसेनच्या गोलंदाजीवर लाँग-ऑफवरून चौकार मारून भारताला एक गडी राखून ऐतिहासिक विजय मिळवून दिला. मोहित २६ चेंडूंत ४९ धावांवर नाबाद राहिला.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language