Hashtagintro

MS Dhoni: चेन्नईकरांच्या हृदयात धोनीला 'थाला'ची जागा कशी मिळाली?

रांचीमध्ये वाढलेला एक साधा मुलगा पुढे जाऊन चेन्नईकरांच्या मनात घर करेल, असं कुणीही स्वप्नातही विचार केला नसेल. तो मुलगा म्हणजे महेंद्रसिंग धोनी. आयपीएलमुळे धोनी आणि चेन्नई हे नातं तयार झालं आणि ते जवळपास दोन दशकं टिकून राहिलं. २००८ च्या पहिल्या लिलावात चेन्नई सुपर किंग्सने धोनीला १.५ मिलियन डॉलरला संघात घेतलं. त्याआधी २००७ चा टी-२० वर्ल्डकप धोनीने युवा टीमसह जिंकला होता. त्यामुळेच चेन्नईचे मालक एन. श्रीनिवासन यांनी धोनीलाच कर्णधार बनवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून धोनी हा चेन्नईचाच झाला.
शांत डोकं, शेवटच्या क्षणी मॅच संपवण्याची कला आणि खेळाडूंवरचा विश्वास, हीच धोनीची ओळख. चेपॉकवर धोनी खेळायला आला की पूर्ण स्टेडियम पिवळं होऊन जायचं. चेन्नईच्या चाहत्यांनी त्याला ‘थाला’ म्हणजे लीडर ही पदवी दिली. तामिळनाडूमध्ये ही बिरुदावली सहसा सुपरस्टार अभिनेत्यांना मिळते, पण धोनीने ती क्रिकेटमधून मिळवली. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने पाच वेळा आयपीएल जिंकली. संघ नेहमी प्लेऑफमध्ये पोहोचायचा. त्याने मोठ्या नावांपेक्षा चांगल्या माणसांना आणि गुणांना महत्त्व दिलं. त्याच्या हाताखाली अनेक तरुण खेळाडू घडले आणि पुढे टीम इंडियापर्यंत पोहोचले.
https://www.prahaar.in/2026/11/17/dhonis-new-innings-begins-he-will-take-on-the-role-of-mentor-for-csk-in-ipl-2027/
फिक्सिंग प्रकरणामुळे चेन्नईवर दोन वर्षांची बंदी आली तेव्हा धोनी पुणे संघात गेला. पण बंदी संपल्यावर तो पुन्हा चेन्नईत परतला. चाहत्यांनी त्याचं जोरदार स्वागत केलं. भावना न दाखवणारा धोनी तेव्हा पहिल्यांदा भावुक झाला होता आणि त्याने जेतेपदाचं वचन दिलं होतं. २०२१ मध्ये त्याने ते वचन पूर्णही केलं. धोनीने चेन्नईसाठी २२६ सामन्यात नेतृत्व केलं, त्यात १३३ विजय मिळवले. आता IPL 2027 पासून तो खेळाडू म्हणून नव्हे, तर मेंटर म्हणून संघासोबत राहणार आहे. खेळाडू म्हणून थाला पर्व संपलं असलं, तरी चेन्नईसोबतचं त्याचं नातं कायम राहणार आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language