Hashtagintro

Mumbai Fire: परळच्या कामगार स्टेडियममध्ये भीषण आग, लाकूड आणि बांबूच्या साहित्याला आग; जीवितहानी नाही

मुंबई: मुंबईतील दादर पश्चिमेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरातील प्रसिद्ध कामगार स्टेडियममध्ये रविवारी सकाळी अचानक आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ प्रचंड भीतीचे आणि धावपळीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, अग्निशामक दलाच्या सतर्कतेमुळे आणि तातडीने केलेल्या कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली आहे.
https://www.prahaar.in/2026/11/08/thane-district-revenue-department-restructuring-kalyan-office/
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ही आग रविवारी सकाळी 10.14 च्या सुमारास लागल्याची नोंद आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे (Disaster Management Cell) करण्यात आली आहे. स्टेडियमच्या मोकळ्या परिसरात मोठ्या प्रमाणावर लाकडी बांबू आणि इतर साहित्य साचवून ठेवण्यात आले होते. अचानक या लाकडी बांबूंच्या साहित्याला भीषण आग लागली. पाहता पाहता आग आणि धुराचे लोट मोठ्या प्रमाणावर पसरू लागले, ज्यामुळे आसपासच्या नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली.
 

परेल येथील कामगार स्टेडियमला लागली आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल | Parel Kamgar Mill Fire
.
.
.
#kamgarmills #parel #kamgarmillsfire #parelfirenews #prahaarnewsline https://t.co/Dl8NGBW2LW
— Prahaar Newsline (@PrahaarNewsline) November 8, 2026

घटनेची माहिती मिळताच मुंबईच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. मुंबई अग्निशामक दल (Mumbai Fire Brigade), मुंबई पोलीस (Mumbai Police), ‘बेस्ट’चे पथक (BEST), 108 रुग्णवाहिका सेवा आणि स्थानिक प्रभाग कार्यालयातील (Ward Staff) अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून अग्निशामक दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी पोहोचून आगीवर पाण्याचा मारा करत आगीवर नियंत्रण मिळवले आणि नागरिकांना काही काळ सुरक्षित स्थळी हलवले. प्रशासनाच्या विविध यंत्रणांमध्ये असलेल्या उत्तम समन्वयामुळे आणि अग्निशामक दलाच्या तत्परतेमुळे अवघ्या काही मिनिटांत, घटनास्थळी दाखल होत आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले.
https://www.prahaar.in/2026/11/08/hit-and-run-in-andheri-speeding-car-rams-into-a-two-wheeler-banker-couple-injured-driver-absconding/
अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झालेली नाही आणि कोणतीही जीवितहानी झालेली नाही, ज्यामुळे स्थानिकांनी मोठा सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. ऐन सणासुदीच्या दिवशी ही मोठी दुर्घटना घडल्यामुळे परिसरामध्ये नागरिकांमध्ये निराशाचे वातावरण होते. कामगार स्टेडियम हे दादरमधील अत्यंत महत्त्वाचे आणि वर्दळीचे ठिकाण मानले जाते. रविवारी सकाळच्या वेळी या परिसरात अनेक नागरिक, खेळाडू आणि स्थानिक लोकांची ये-जा असते. अशा वेळी आग लागल्यामुळे मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. परंतु, सर्व संबंधित यंत्रणांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आग जास्त पसरू शकली नाही आणि वेळीच आटोक्यात आली. सध्या अग्निशामक दल आणि मुंबई पोलीस या आगीचे नेमके कारण काय होते, याचा अधिक तपास करत आहेत. ही आग शॉट सर्किटमुळे लागली की कचरा अथवा लाकडी साहित्याला कोणीतरी लावलेल्या ठिणगीमुळे भडकली, याचा शोध घेतला जात आहे. तसेच, या घटनेत स्टेडियम परिसरातील मालमत्तेचे नेमके किती नुकसान झाले आहे, याचा सविस्तर पंचनामा आणि अंदाज घेण्याचे काम सध्या सुरू आहे.

Source: Prahaar News

Read full article on Prahaar News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language