Hashtagintro

Mumbai Indians : ज्या जसप्रीत बुमराहला 18 कोटी रुपये मोजून रिटेन केलं, त्यानेच रोहित शर्मा कॅप्टन बनताच मुंबई इंडियन्सला दिला झटका

Mumbai Indians : ज्या जसप्रीत बुमराहला 18 कोटी रुपये मोजून रिटेन केलं, त्यानेच रोहित शर्मा कॅप्टन बनताच मुंबई इंडियन्सला दिला झटका

टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्माला पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच कॅप्टन बनवण्यात आलं आहे. आयपीएल 2027 मध्ये तो टीमचं नेतृत्व करेल. मागच्या तीन सीजनमध्ये हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन होता. पण तो टीमला यश मिळवून देऊ शकला नाही. ड्रेसिंग रुममध्ये गटबाजी असल्याच्या बातम्या सुद्धा आलेल्या. त्यामुळेच पुन्हा एकदा मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने रोहित शर्मावर विश्वास दाखवला आहे. पण याच दरम्यान जसप्रीत बुमराह बद्दल एक माहिती समोर आली आहे. बुमराहने रोहितच्या टीममध्ये उपकर्णधार म्हणून काम करण्यास नकार दिला आहे. बुमराहने मुंबई इंडियन्समध्ये उपकर्णधारपदाची ऑफर धुडकावून लावली आहे.

मुंबई इंडियन्सच्या मॅनेजमेंटने सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि तिलक वर्मा यांच्यापैकी एकाचीही कर्णधारपदी निवड केली नाही. सूर्यकुमार यादवने याचवर्षी टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कप जिंकवून दिला. पण फ्रेंचायजीने त्याच्यावर विश्वास दाखवला नाही. भारताच्या टी20 टीमचा उपकर्णधार तिलक वर्माला भविष्यासाठी तयार केलं जात आहे.

त्यावेळी बुमराह नेतृत्व करत होता

मुंबई इंडियन्सकडे सध्या कोणीही उपकर्णधार नाहीय. कॅप्टनच्या अनुपस्थितीत अनुभवी खेळाडूला ही जबाबदारी स्वीकारावी लागते. मागच्या सीजनमध्ये हार्दिक पंड्या नसताना सूर्यकुमार यादव आणि जसप्रीत बुमराह टीमचं नेतृत्व करत होते.

ते अजून समोर आलेलं नाही

मुंबई इंडियन्सने बुमराहला कॅप्टन बनवण्याऐवजी उपकर्णधारपदाचा प्रस्ताव दिला होता. फ्रेंचायजीने ऑक्टोंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बुमराहशी संपर्क साधून त्याला उपकर्णधारपदाचा प्रस्ताव दिलेला. पण बुमराहने विनम्रतेने नकार दिला. त्याने असं का केलं? ते अजून समोर आलेलं नाही.

18 कोटी रुपये मोजून रिटेन केलेलं

बुमराहला 2025 च्या मेगा ऑक्शनआधी मुंबई इंडियन्सने 18 कोटी रुपये मोजून रिटेन केलेलं. हार्दिक पंड्या, रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांनी फ्रेंचायजीमध्ये राहण्यासाठी आपल्या सॅलरीमध्ये कपातीचा प्रस्ताव स्वीकारलेला. 2026 मध्ये ज्यावेळी बुमराहला मुंबई इंडियन्सने स्टँड इन कॅप्टन बनवलं. त्यावेळी तो मस्करीत बोलला की, मी विचार केला नव्हता की, ‘MI चा कॅप्टन बनण्याआधी टेस्ट कॅप्टन होईन’

बुमराह मुंबई इंडियन्ससाठी कधीपासून खेळतोय?

जसप्रीत बुमराहने वयाच्या 19 व्या वर्षी मुंबई इंडियन्ससाठी डेब्यू केलेला. त्याच्या गोलंदाजी Action ची त्यावेळपासून चर्चा आहे. आतापर्यंत आयपीएलच्या 14 सीजनमध्ये त्याने एकूण 187 विकेट काढलेत. फ्रेंचायजीच्या भरवाशाच्या खेळाडूंपैकी तो एक आहे. टीमला कसं संभाळायचं आणि चांगला समन्वय राखायचा हे रोहित शर्माला चांगलं कळतं. अजून दोन किंवा त्यापेक्षा जास्त काळ रोहित टीमचं नेतृत्व करु शकतो.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language