Hashtagintro

Mumbai Police: ३६ वर्षांपासून फरार आरोपी गुजरातमधून जेरबंद

मुंबई: तब्बल ३६ वर्षांपासून फरार असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष दोनने गुजरातमधील वडोदरा येथून अटक केली.

न्यायालयीन सुनावणीदरम्यान वारंवार गैरहजर राहिल्याने त्याच्याविरुद्ध स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. प्रत्यक्ष माहिती व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पोलिसांनी शोध घेऊन ३० ऑक्टोबर रोजी पोर गावातून त्याला ताब्यात घेतले.

संबंधित गुन्ह्यातील फिर्यादी हे २९ वर्षांचे असताना त्यांच्या दुकानातील हिरे, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम पोहोचविण्यासाठी जात होते. त्यावेळी पंचरत्न इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर चार अज्ञात इसमांनी संगनमत करून त्यांना अडविले.

रिव्हॉल्व्हर आणि चॉपरचा धाक दाखवत त्यांना मारहाण करून जखमी केले. त्यानंतर त्यांच्याकडील हिरे, सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण २० लाख ४८ हजार ९६४ रुपयांचा ऐवज लुटून आरोपी पसार झाले होते.

या प्रकरणी डॉ. दादाभाई भडकमकर मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपास गुन्हे शाखा कक्ष दोनकडे सोपविण्यात आला. तपास पूर्ण करून आरोपींविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language