Hashtagintro

Nagpur Graduate Constituency : ॲड. अभिजित वंजारी यांच्या ऐतिहासिक विजयाचा जल्लोष!

नागपूर – नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय संपादन केल्याबद्दल ऐतिहासिक विजयाचा आनंदोत्सव व विजय जल्लोष आयोजित करण्यात आला.

प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव गिरीश कृष्णराव पांडव यांच्या पुढाकाराने हा विजय जल्लोष मेडिकल चौक, नागपूर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आला. नवनिर्वाचित आमदार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी स्वतः उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे आजी-माजी नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी, युवक काँग्रेस, NSUI चे पदाधिकारी व कार्यकर्ते, काँग्रेसचे विविध स्तरांवरील पदाधिकारी तसेच महाविकास आघाडीचे सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले.

पदवीधर मतदारांनी दाखविलेला विश्वास, कार्यकर्त्यांची मेहनत आणि महाविकास आघाडीच्या एकजुटीचे प्रतीक म्हणून या विजयाकडे पाहिले जात आहे.

हा विजय महाविकास आघाडीच्या एकजूटीचा : अभिजित वंजारी

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघातील हा विजय माझा एकट्याचा नसून, माझ्यावर विश्वास व्यक्त करणाऱ्या प्रत्येक पदवीधराचा, काँग्रेस पक्षाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांचा आणि महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांच्या एकजुटीचा विजय आहे. लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवून परिवर्तनाच्या बाजूने उभ्या राहिलेल्या सर्व मतदारांचे मी मनःपूर्वक आभार मानतो.

बेरोजगार पदवीधरांना रोजगाराच्या संधी, युवकांच्या प्रश्नांना न्याय, शिक्षण क्षेत्रातील समस्या, नोकरभरती, जुनी पेन्शन योजना आणि कर्मचारी वर्गाच्या विविध मागण्यांसाठी माझा लढा यापुढेही अधिक ताकदीने सुरू राहील.हा विजय म्हणजे केवळ एका उमेदवाराचा विजय नसून, पदवीधरांच्या अपेक्षांचा आणि लोकशाहीतील जनशक्तीचा विजय आहे

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language