Hashtagintro

Nanded Accident : उभ्या ऊसाच्या ट्रॅक्टर-ट्रॉली धडकून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

हदगाव : हदगाव तालुक्यातील उमरी दर्याबाई येथून हदगावकडे जाणाऱ्या दुचाकीची रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ऊसाने भरलेल्या नादुरुस्त ट्रॅक्टर-ट्रॉलीला जोरदार धडक बसून भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर त्याच्यासोबतचा त्याचा मित्र गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी (दि.२०) रात्री साडेदहाच्या सुमारास घडली. रोहन रमेश नरवाडे (वय १८) असे मृत तरूणाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, रोहन आणि त्याचा मित्र रात्री दुचाकीवरून (क्र. MH 26 DB 5653) हदगावकडे निघाले होते. घराबाहेर पडताना रोहनच्या आई-वडिलांनी त्याला “रात्रीच्या वेळी बाहेर जाऊ नकोस” असे बजावून सांगितले होते. परंतु, ‘मला हदगावला जावेच लागेल’ असे सांगत तो घराबाहेर पडला. त्यानंतर काही वेळातच रात्री १०:५१ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या गाडीचा भीषण अपघात झाला.

साखर कारखाना परिसरात रस्त्यावर ऊसाने भरलेले एक नादुरुस्त ट्रॅक्टर उभे होते. समोरून येणाऱ्या वाहनाचा तीव्र प्रकाश रोहनच्या डोळ्यांवर पडल्याने त्याचे डोळे दिपले असावेत आणि त्यामुळे अंधारात रस्त्यावर उभे असलेले ट्रॅक्टर त्याच्या निदर्शनास आले नसावे, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या धडकेत रोहनचा जागीच मृत्यू झाला.

अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी तरूणाला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत अद्याप पोलिसांत अधिकृत तक्रार नोंदवली गेली नव्हती, त्यामुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया प्रलंबित होती.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language