Hashtagintro

Naseeruddin Shah: नसीरुद्दीन शाह यांनी बॅग उचलून पाकिस्तानात निघून जावं..; भडकले नितेश राणे

Naseeruddin Shah: नसीरुद्दीन शाह यांनी बॅग उचलून पाकिस्तानात निघून जावं..; भडकले नितेश राणे

ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. अलीकडेच नसीरुद्दीन शाह यांनी एक व्हिडीओ शेअर करत आपण स्वतःला ‘दिमागी नक्षल’ म्हणवून घेण्यात अभिमान वाटत असल्याचं म्हटलं होतं. यासोबतच त्यांनी सरकारवर प्रश्न उपस्थित करत इशाराही दिला होता. अशातच आता भाजपचे नेतेही नसीरुद्दीन शाह यांच्यावर निशाणा साधत आहेत. यापूर्वी केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी नसीरुद्दीन शाह यांना लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचं म्हटलं होतं. तर आता महाराष्ट्रातील मंत्री नितेश राणे यांनी नसीरुद्दीन शाह यांना थेट पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला आहे.

नितेश राणे म्हणाले, “पाहा, नसीरुद्दीन शाह यांच्यासारखे लोक कमाई तर आपल्या हिंदू राष्ट्रात करतात, पण मीठ पाकिस्तानचं खातात. पाकिस्तानात बसलेले त्यांचे जे अब्बा आहेत, ते अशा जिहादी आणि दिमागी नक्षलवाद्यांना स्क्रिप्ट देतात. नसीरुद्दीन शाह यांचा जन्म आणि संगोपन आपल्या हिंदू राष्ट्रात झालं आहे. त्यांचे चित्रपट इथे प्रदर्शित होतात, पाकिस्तानमध्ये नाहीत. ज्या देशात ते कमावतात, त्याच हिंदू राष्ट्रात बसून ते अशा प्रकारची वक्तव्यं करत आहेत. जर नसीरुद्दीन शाह यांना आपल्या हिंदू राष्ट्राचा इतका राग असेल आणि स्वतःला दिमागी नक्षल म्हणवून घ्यायचं असेल, तर त्यांनी पाकिस्तानात निघून जावं.”

“तिथे त्यांना अशा विचारांचे अनेक लोक भेटतील. तिथे दिमागी नक्षलवादी आणि जिहादींची मोठी संख्या आहे. नसीरुद्दीन शाह यांनी आपलं सामान बांधून पाकिस्तानला निघून जावं. आज आपला भारत देश हिंदू राष्ट्र नसता, तर त्यांना कोणी ओळखलंसुद्धा नसतं”, असा टोला नितेश राणेंनी लगावला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून नसीरुद्दीन शाह हे हिंदी चित्रपटसृष्टीतील एक महत्त्वाचे आणि प्रभावी अभिनेते म्हणून ओळखले जातात. आपल्या दमदार अभिनयासोबतच सामाजिक आणि राजकीय विषयांवरील स्पष्ट मतांमुळेही ते चर्चेत असतात. विविध मुद्द्यांवर त्यांनी यापूर्वीही आपली भूमिका मांडली आहे. मात्र, त्यांच्या वक्तव्यांमुळे अनेकदा राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

नेमका वाद काय आहे?

हा वाद नसीरुद्दीन शाह यांच्या एका व्हिडीओमुळे सुरू झाला. त्यांनी जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. तसंच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि देशातील शिक्षणव्यवस्थेवरून केंद्र सरकारवर टीका केली होती. यावेळी त्यांनी स्वतःला अभिमानाने ‘दिमागी नक्षल’ म्हणवून घेतलं. सरकारकडून टीका करणाऱ्यांना देशविरोधी आणि टुकडे-टुकडे गँग अशी विशेषणं लावली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language