Hashtagintro

Nashik News : दहिवड येथील तरुणाच्या मृत्यूप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

देवळा : दहिवड (ता. देवळा) येथील चेतन दयाराम देवरे (वय ३८) यांनी गुरुवारी (दि. २९) दुपारी दहिवड शिवारातील गायकवाड मळा येथे जीवन संपवल्याची घटना घडली. या प्रकरणी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून दहिवड येथील दोघांविरुद्ध देवळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चेतन देवरे यांच्या मृत्यूप्रकरणी शांताराम श्रावण देवरे यांनी देवळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीत रोहिणी पुरुषोत्तम शिंदे आणि दामोदर दोधा शिंदे (दोघेही रा. दहिवड) यांनी फोन कॉल व संदेशांच्या माध्यमातून चेतन देवरे यांना मानसिक त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. या कथित त्रासामुळे त्यांच्यावर मानसिक दबाव निर्माण झाल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, मृत चेतन देवरे यांनी लिहिलेली तीन पानी चिठ्ठी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. या चिठ्ठीतील मजकूर, फिर्यादीतील आरोप आणि घटनेशी संबंधित अन्य बाबींच्या अनुषंगाने पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक हेमंत राऊत या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language