Hashtagintro

NCP Meeting: पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठांची नाराजी; कोअर कमिटी बैठकीत कानमंत्र, पार्थ-जय पवारांनी दिलं आश्वासन, काय ठरलं?

NCP Meeting: पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर राष्ट्रवादीच्या ज्येष्ठांची नाराजी; कोअर कमिटी बैठकीत कानमंत्र, पार्थ-जय पवारांनी दिलं आश्वासन, काय ठरलं?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील अंतर्गत नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागली आहे. पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि पार्थ पवार यांच्यातील समन्वयाचा मुद्दा कोअर कमिटीच्या बैठकीत चर्चेला आला. पार्थ पवार यांच्या कार्यपद्धतीवर या बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाचा कारभार सर्वांना सोबत घेऊन आणि सर्वानुमते चालला पाहिजे. तसेच पक्षातील ज्येष्ठ नेत्यांचा अनुभव आणि सल्ला विचारात घेतला पाहिजे, अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी मांडल्याचे समजते.

पक्षातील महत्त्वाच्या पदांवरील निवड प्रक्रियेत ज्येष्ठ नेत्यांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार करण्यात आली होती. मुंबई अध्यक्ष, राष्ट्रीय मुख्य प्रवक्ता, युवती अध्यक्ष, युवक प्रदेशाध्यक्ष आणि राष्ट्रीय युवक प्रदेशाध्यक्ष या पदांच्या निवडीदरम्यान पार्थ पवार यांनी वरिष्ठ नेत्यांना डावलल्याची नाराजी बैठकीत व्यक्त झाल्याची माहिती आहे. त्यामुळे पक्षातील अनेक ज्येष्ठ नेते नाराज असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

या बैठकीला पार्थ पवार आणि जय पवार उपस्थित होते. त्यांनी ज्येष्ठ नेत्यांचे म्हणणे ऐकून घेतले. यापुढे सर्व ज्येष्ठ नेत्यांशी समन्वय साधून आणि त्यांना विश्वासात घेऊन काम केले जाईल, असे आश्वासन पार्थ आणि जय पवार यांनी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली. याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली होती. या भेटीत पार्थ पवार आणि सुनेत्रा पवार यांच्या कार्यपद्धतीबाबत नाराजी व्यक्त करण्यात आल्याची माहिती आहे.

तसेच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे विलीनीकरण नको आणि राज्याचे अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहावे, अशी भूमिका वरिष्ठ नेत्यांनी अमित शाह यांच्यासमोर मांडल्याचे बैठकीत सांगण्यात आल्याचे समजते. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी उद्या पक्षातील सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी संध्याकाळी सात वाजता ही बैठक होणार आहे. तब्बल चार महिन्यांनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक होत आहे.

या बैठकीत आमदारांशी पक्षाच्या संघटनात्मक परिस्थितीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पक्षातील मंत्र्यांकडून दौरे केले जाणार असल्याची माहिती आमदारांना दिली जाण्याची शक्यता आहे. कोअर कमिटीतील नाराजीच्या पार्श्वभूमीवर उद्याच्या बैठकीत सुनेत्रा पवार आमदारांशी काय संवाद साधतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language