Hashtagintro

NCP News: ‘एकत्र यायचं असेल तर…’, रोहित पवारांनी घातली अट, विलिनीकरणाला का लागला ब्रेक?

NCP News: ‘एकत्र यायचं असेल तर…’, रोहित पवारांनी घातली अट, विलिनीकरणाला का लागला ब्रेक?

NCP Merjer News:  सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट अन् शरद पवार गटाच्या विलीनीकरणाची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांनी घेतलेली शरद पवार यांची भेट, त्यानंतर शरद पवारांसोबत दोन्ही नेत्यांच्या झालेल्या बैठकांमुळे या चर्चांना उधाण आलं होते. मात्र सध्यातरी विलीनीकरणाच्या कोणत्याही चर्चा नाहीत, असं दोन्ही गटाच्या नेत्यांनी स्पष्ट केलं आहे. याबाबतच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सरचिटणीस राजेंद्र माने यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.

काय म्हणालेत राजेंद्र माने? 

अजित पवार यांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. आमचे नेते पवार साहेब, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे तसेच रोहित पवार यांनीही विलीनीकरणाचा मुद्दा आमच्यासाठी संपलेला आहे असं सांगितलेले आहे. कारण या सर्व निर्णयामागे अजित पवार होते. आम्ही महापालिका जिल्हापरिषदेच्या निवडणुका एकत्र लढवल्या होत्या. त्यामुळे एकत्र निर्णय घेणे आवश्यक होते, ते झालं नाही. त्यामुळे विलिनीकरणाचा मुद्दा आता संपला, असं सुनील माने म्हणालेत.

रोहित पवार यांनी घातली अट…

तसेच  राष्ट्रवादी काँग्रेसच्या पत्रात, राष्ट्रवादीच्या मासिकातही विलिनीकरणाचा मुद्दा आता संपला आहे, असं प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी म्हटलं आहे.त्यामुळे आत्ता फक्त माध्यमांमध्येच याची चर्चा सुरु आहे. रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे की जर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात यायला लागेल त्याचवेळी भारतीय जनता पक्षाची साथ सोडून यावं लागेल. त्यामुळे आम्हाला आता वाटतं की विलीनीकरणाच्या आता कोणत्याही चर्चा नाहीत, असं राष्ट्रवादीचे सरचिटणीस सुनील माने यांनी स्पष्ट केले आहे.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी विलीनीकरणाबाबत मोठे विधान केले होते. अजित पवार हे 12 फेब्रुवारीलाच विलीनीकरणाची घोषणा करणार होते असं ते म्हणाले ज्यानंतर राष्ट्रवादीच्या एकत्रिकरणाच्या चर्चांना जोर आला. मात्र आता सुनील तटकरे यांनीही याबाबत युटर्न घेत विलीनीकरणाचा विषय थांबल्याचे स्पष्ट केले आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language