Hashtagintro

New Cyclone Threat | ‘अर्णब’नंतर आंध्रवर पुन्हा नव्या चक्रीवादळाचे सावट

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : ‘अर्णब’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेशात हाहाकार माजवून अवघे काही दिवस उलटत नाहीत तोच, राज्यावर आणखी एका नव्या चक्रीवादळाचे संकट घोंगावत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेली हवामान प्रणाली पुढील २४ तासांत तीव्र चक्रीवादळात रूपांतरित होण्याची दाट शक्यता असून, २ नोव्हेंबरपर्यंत ते आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचू शकते, असा इशारा भारतीय हवामान विभागाने शनिवारी दिला.

गेल्या २८ ऑक्टोबर रोजी ‘अर्णब’ चक्रीवादळाने आंध्र प्रदेश आणि यानम किनारपट्टी ओलांडली होती. या वादळामुळे किमान पाच जणांचा मृत्यू झाला, तर शेती पिकांचे आणि पायाभूत सुविधांचे अतोनात नुकसान झाले. त्या तडाख्यातून सावरण्याआधीच नव्या संकटाने प्रशासनाची चिंता वाढवली आहे.

हवामान प्रणालीची सद्यस्थिती

दक्षिण अंदमान समुद्र आणि लगतच्या उत्तर अंदमान समुद्र तसेच अंदमान-निकोबार बेटांवर तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र आता अधिक तीव्र झाले आहे. शनिवार सकाळच्या हवामान बुलेटिननुसार, ही प्रणाली पुढील सहा तासांत तीव्र दाबाच्या क्षेत्रात रूपांतरित होईल आणि त्यानंतरच्या २४ तासांत तिचे रूपांतर चक्रीवादळात होईल. ही यंत्रणा पश्चिम-वायव्य दिशेने पुढे सरकणार आहे.

मुसळधार पाऊस, जोरदार वाऱ्याचा इशारा

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार : तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्ये ५ नोव्हेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडेल. केरळ आणि माहे येथे ४ नोव्हेंबरपर्यंत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आंध्र किनारपट्टीवर समुद्र खवळलेला राहील. १ नोव्हेंबरपर्यंत किनारपट्टी भाग, यानम आणि रायलसीमा परिसरात ताशी ३० ते ४० किमी वेगाने, तर काही ठिकाणी ताशी ५० किमी वेगाने वारे वाहतील. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

उद्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता

हे संभाव्य चक्रीवादळ २ नोव्हेंबरच्या संध्याकाळपर्यंत पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरातून आंध्र प्रदेश किनारपट्टीजवळ पोहोचण्याचा अंदाज आहे. मात्र, ते नेमके कुठे जमिनीवर आदळेल याबाबत हवामान विभागाने अद्याप कोणतीही स्पष्ट घोषणा केलेली नाही.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language