Hashtagintro

Nitish Bharadwaj : 13 वर्षांपासून पत्नीसोबत शारीरिक संबंध नाहीत, तिनं मला फक्त एटीएम कार्ड समजलं…‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांनी बायकोवर केलेले धक्कादायक आरोप

Nitish Bharadwaj : 13 वर्षांपासून पत्नीसोबत शारीरिक संबंध नाहीत, तिनं मला फक्त एटीएम कार्ड समजलं…‘महाभारत’ फेम नितीश भारद्वाज यांनी बायकोवर केलेले धक्कादायक आरोप

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘महाभारत’मध्ये भगवान श्रीकृष्णाची भूमिका साकारून घराघरांत पोहोचलेले अभिनेते नितीश भारद्वाज त्यांच्या अभिनयापेक्षा सध्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करणाऱ्या नितीश यांच्या वैवाहिक आयुष्यात अनेक वाद निर्माण झाले होते. त्यांची दुसऱ्या पत्नी स्मिता गाटे यांच्यासोबतच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असून दोघांमधील वाद अनेकदा सार्वजनिक झाला आहे. अशातच नितीश यांनी एका मुलाखतीत आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल काही धक्कादायक खुलासे केले होते.

‘१३ वर्षांपासून आमच्यात शारीरिक संबंध नव्हते’

नितीश भारद्वाज यांनी ‘टेली टॉक इंडिया’ला दिलेल्या मुलाखतीत पत्नी स्मिता यांच्यासोबतच्या नात्याबद्दल भाष्य केलं होतं. गेल्या 13 वर्षांपासून दोघांमध्ये पती-पत्नीचे शारीरिक संबंध नव्हते. ते जेव्हा पत्नीच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करायचे, तेव्हा स्मिता त्यांना दुसऱ्या खोलीत झोपायला सांगायच्या. मुली आईसोबत झोपायच्या, त्यामुळे नितीश यांना वेगळं राहावं लागायचं, असा दावा त्यांनी केला होता. नितीश यांनी पुढे सांगितलं की, पत्नीनं त्यांना मुलांसोबत भावनिक नातं निर्माण करू दिलं नाही. पती-पत्नीमधील नात्यात जवळीक उरली नव्हती, असंही त्यांनी म्हटलं होतं.

‘मला फक्त एटीएम कार्ड समजलं, विकी डोनर बनवलं’

मुलाखतीदरम्यान नितीश यांनी पत्नीवर आर्थिक कारणांसाठी आपला वापर केल्याचा आरोपही केला होता. ते म्हणाले होते की, स्मिता यांना त्यांच्याकडून फक्त पैसे हवे होते. मुलांना जन्म दिल्यानंतर आपल्याला केवळ आर्थिक जबाबदारी पार पाडणाऱ्या व्यक्तीप्रमाणे वागवलं गेलं. याबद्दल बोलताना त्यांनी संताप व्यक्त केला होता. ‘आधी मुलांना जन्म दिला आणि नंतर मला विकी डोनर बनवलं. त्यांना फक्त माझे पैसे हवे होते. मी एटीएम कार्ड आहे का? मी एक जिवंत माणूस आहे’ असं म्हणत त्यांनी नाराजी व्यक्त केली होती.

पत्नीच्या आधीच्या लग्नांबाबतही केला होता दावा

नितीश यांनी स्मिता यांच्या आधीच्या वैवाहिक आयुष्याबद्दलही काही दावे केले होते. स्मिता यांचं हे तिसरं लग्न असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. त्यांना पती-पत्नीचं नातं टिकवण्याची इच्छा नव्हती, असा आरोपही त्यांनी केला होता. दरम्यान, स्मिता यांनीही नितीश यांचे आरोप फेटाळत आपली बाजू मांडली होती. त्यांनी मुलींना वडिलांना भेटण्यापासून कधीही रोखलं नसल्याचं सांगितलं होतं.

Source: TV9 Marathi Entertainment

Read full article on TV9 Marathi Entertainment

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language