Hashtagintro

Nvidia CEO Affair : जगातील दिग्गज टेक कंपनी एनव्हिडियाच्या सीईओचं चिनी महिला गुप्तहेरासोबत अफेअर, अमेरिकेत एकच खळबळ, ‘हो मी बेवफा’ बायकोला फसवलं

Nvidia CEO Affair : जगातील दिग्गज टेक कंपनी एनव्हिडियाच्या सीईओचं चिनी महिला गुप्तहेरासोबत अफेअर, अमेरिकेत एकच खळबळ, ‘हो मी बेवफा’ बायकोला फसवलं

अमेरिकेतील दिग्गज टेक्नोलॉजी कंपनी Nvidia चे CEO आणि सहसंस्थापक जेनसेन हुआंग वादात सापडले आहेत. चीनसाठी हेरगिरी करणाऱ्या एका महिलेसोबत त्यांचे प्रेम संबंध असल्याचा खुलासा झाला आहे. यामुळे अमेरिकेत एकच खळबळ उडाली आहे. हुआंग यांनी पत्नीची फसवणूक केल्याचं मान्य केलं आहे. त्यांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यांची माफी मागितली आहे. विषयाची गंभीरता लक्षात घेऊन Nvidia च्या बोर्डाने या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी सुरु करण्याची घोषणा केली आहे. CNN ने दिलेल्या वृत्तानुसार, चीफ एग्जीक्यूटिव ऑफिसर CEO आणि संस्थापक जेन्सेन हुआंग यांच्या विरोधात स्वतंत्र चौकशी सुरु करत असल्याची Nvidia ने घोषणा केली आहे. कंपनीच्या वेबसाइटवर ही माहिती देण्यात आली आहे.

अमेरिकी अधिकाऱ्यांनी जेन्सेन हुआंग आणि सिंगापूरची कंपनी मेगास्पीडची एग्जीक्यूटिव ऐलिस हुआंग यांच्यामध्ये असलेल्या संबंधांवर चिंता व्यक्त केली होती. फायनान्शिअल टाइम्सच्या एका रिपोर्टनुसार, अमेरिकी गुप्तचर यंत्रणेने या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची अमेरिकन अधिकाऱ्यांना माहिती दिली होती. सध्या AI आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा काळ आहे. यात Nvidia दिग्गज चीप निर्माण करणारी कंपनी आहे. या कंपनीचं मार्केट कॅपिटलायजेशन जवळपास 4.5 ट्रिलियन डॉलर आहे.

हो मी ‘बेवफा’

जेनसेन हुआंग यांनी कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या पत्रात हे मान्य केलय की, पत्नीशिवाय त्यांचे आणखी एका महिलेसोबत संबंध होते. त्यांनी त्या महिलेचं नाव सांगितलं नाही. मिडिया रिपोर्ट्सनुसार जेनसेन हुआंग यांनी Nvidia च्या कर्मचाऱ्यांना पाठवलेल्या एका अंतर्गत संदेशात खासगी नात्याची कबुली देत माफी मागितली आहे. पत्नीची फसवणूक केल्याचं त्यांनी मान्य केलं आहे. यामुळे त्यांचं कुटुंब दुखावलं गेलं आहे. 63 वर्षीय हुआंग यांनी Nvidia कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात हो मी ‘बेवफा’ होतो असं लिहिलं आहे. पत्नी तसचं मुलांना मी दु:ख दिलं आहे. त्यांनी संपूर्ण प्रकाराची जबाबदारी घेत कंपनीचे कर्मचारी, बोर्ड, गुंतवणूकदार, शेअरधारक यांचा पुन्हा नव्याने विश्वास जिंकण्याचा प्रयत्न करु असं म्हटलं आहे. वाद वाढल्यानंतर Nvidia च्या बोर्डाने स्वतंत्र चौकशीचा निर्णय जाहीर केला आहे.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language