Hashtagintro

ODI World Cup 2027 मध्ये खेळण्यासाठी विराट, रोहितच्या मनात जी भिती होती ती BCCI अध्यक्षांनी काढून टाकली पण दोन अटी टाकल्या

ODI World Cup 2027 मध्ये खेळण्यासाठी विराट, रोहितच्या मनात जी भिती होती ती BCCI अध्यक्षांनी काढून टाकली पण दोन अटी टाकल्या

पुढच्यावर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप टुर्नामेंटमध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा टीमचा भाग असणार का? याची चर्चा बऱ्याच काळपासून सुरु आहे. रोहित शर्माच्या वनडे क्रिकेटमधील भवितव्याबद्दल बऱ्याच चर्चा, बातम्या झाल्या. अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रोहितच्या जागी यशस्वीला संधी देण्याचा पूर्ण प्लान बनवलेला. पण इंग्लंड मधल्या दमदार प्रदर्शनामुळे रोहितने आपली जागा कायम ठेवली. बीसीसीआय अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी स्पष्ट केलय की, “रोहित आणि कोहलीची वनडे वर्ल्ड कपासाठी टीममध्ये निवड फिटनेस आणि प्रदर्शन या आधारावरच होईल. वयाचा अडथळा येणार नाही”

वर्ल्ड कपसाठी सिनियर खेळाडूंची निवड प्रदर्शनाच्या आधारावरच होईल. वनडे वर्ल्ड कप 2027 ऑक्टोंबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामीबियामध्ये होणार आहे. टीम इंडिया आता न्यूझीलंडच्या मोठ्या दौऱ्यावर जाणारआहे. त्याआधी मिथुन मन्हास स्पोर्ट्सस्टारशी बोलताना म्हणाले की, “माझ्या दृष्टीकोनातून निवडीसाठी फिटनेस आणि प्रदर्शन हेच निकष असले पाहिजेत. वय अजिबात मुद्दा नसावा. एखादा खेळाडू फिट आहे, चांगलं प्रदर्शन करतोय आणि देशासाठी सामने जिंकून देतोय, तर हीच गोष्ट आवश्यक आहे”

बीसीसीआय अध्यक्ष काय म्हणाले?

भारताचे दोन दिग्गज खेळाडू रोहित शर्मा आणि विराट कोहलीने टी20 आणि टेस्ट फॉर्मेटमधून निवृत्ती घेतली आहे. आता ते भारतासाठी फक्त वनडे मध्ये खेळतात. 2023 साली रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने वनडे वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली होती. पण फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभव झाला. “शुबमन गिल टीम इंडियाशिवाय गुजरात टायटन्सचा मागच्या दोन-तीन वर्षांपासून कॅप्टन आहे. वर्ल्ड कप अभियानाची सुरुवात करताना हा अनुभव गिलच्या कामी येईल असं मला वाटतं. विराट, हार्दिक आणि रोहित टीम मध्ये असल्यास त्याला फायदा होईल. मग, जसप्रीत बुमराह आहे. तो सुद्धा नेतृत्व करु शकतो. शुबमन अनुभवी आहे. आसपास अनुभवी खेळाडू असण्याचा त्याला फायदा होईल” असं मिथुन मन्हास म्हणाले.

टेस्ट सीरीजसाठी भारतीय टीम

शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैसवाल, केएल राहुल (उपकर्णधार), देवदत्त पड़िक्कल, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अंशुल कम्बोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नीतीश कुमार रेड्डी, वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज.

Source: TV9 Marathi Sports

Read full article on TV9 Marathi Sports

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language