Hashtagintro

Pankaja Munde : माझी हौस नव्हती, जालन्यातील महिलांसाठी रॅम्पवर उतरले… पंकजा मुंडेंचं टीकाकारांना सडेतोड उत्तर

राजकारणात बावीस वर्षांपासून सक्रिय असलेल्या नेत्या आणि ग्रामीण भागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पंकजा मुंडे यांनी नुकत्याच मुंबईत झालेल्या बॉम्बे टाइम्स फॅशन वीकवरील आपल्या रॅम्प वॉकबद्दल स्पष्टीकरण दिले आहे. ग्रामीण महिलांना न्याय मिळावा आणि त्यांच्या कामाला ओळख मिळावी, या उद्देशानेच आपण हा रॅम्प वॉक केला, असे त्यांनी सांगितले.

जालना जिल्ह्यातील महिलांनी तयार केलेल्या साड्यांचा स्टॉल या मोठ्या फॅशन इव्हेंटमध्ये लागणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असल्याचे मुंडे यांनी म्हटले. सेलिब्रिटी आणि मॉडेल्सनी या साड्यांना स्पर्श करून बघितले आणि ऑर्डरबद्दल विचारणा केली, ही जालन्यातील महिलांसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. आपल्याला रॅम्प वॉक करण्याची वैयक्तिक हौस नसून, जर मुंबईतील एखाद्या महिलेने जालन्याची साडी विकत घेतल्यास त्याचा पैसा थेट जालन्यातील महिलांच्या खिशात जाईल, या भूमिकेतून आपण हे पाऊल उचलल्याचे त्यांनी सांगितले. टीकांना उत्तर देण्याची आवश्यकता वाटत नसून, महिलांच्या हितासाठी परत रॅम्प वॉक करावा लागल्यास तो पुन्हा करेन, असेही त्यांनी ठामपणे नमूद केले.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language