कोंबडी पालन करायचे असेल तर जास्त अंडी देणाऱ्या कोंबड्या फायदेशीर असतात. मात्र, अशा जातीच्या कोंबड्याची निवड काळजीपूर्वक करावी लागते. काही जाती वर्षभर ३५० अंडी देऊ शकतात. तर काही जाती अंड्या सोबत मांसासाठी देखील फायद्याच्या असतात. चला तर पाहूयात कोणत्या दोन जाती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असतात.
कोंबडीच्या व्हाईट लेगहॉर्न आणि रोड आयलँड रे जाती अंड्यांसाठी ओळखल्या जातात. व्हाईट लेगहॉर्न अंडी उत्पादनासाठी प्रचंड लोकप्रिय जात आहे. ही कोंबडी एका वर्षात सुमारे २८० ते ३५० अंडी देऊ शकतात. हीचे शरीर हलके आणि बारीक असते. यासाठी हिला कमी खर्चात जास्त अंडी देणारी कोंबडी म्हटले जाते.
व्हाईट लेगहॉर्न कोंबडी सुमारे २० आठवड्याच्या वयात अंडी देण्यास सुरुवात करतात. यांना रोज ११० ते १४० ग्रॅम दाण्यांची गरज असते. कमी वयात अंडी देण्यास सुरुवात केल्याने या कोंबड्या व्यावसायिक पोल्ट्री फार्मसाठी फायदेशीर असतात.
रोड आयलँड रेड अमेरिकेची प्रसिद्ध कोंबडीची जात आहे. याचा रंग हलका करडा असतो. ही कोंबडी वर्षभरात २०० ते २५० अंडी देते. हीची अंडी हलक्या करड्या रंगाची असतात. खास बाब म्हणजे या कोंबडीला अंड्या सोबत मांसासाठी देखील पाळले जाते.
कोंबड्याच्या सर्व जाती सारख्या नसतात. काही जाती जास्त अंडी देण्यासाठी ओळखल्या जातात. काही कमी काळात जास्त मांस देतात. तर काही जाती आजारांशी लढण्यास सक्षम असतात. यामुळे फॉर्म सुरु करण्याच्या आधी आपल्या गरजेनुसार कोंबड्यांची खरेदी करावी.
केवळ जास्त अंडी देणारी जात खरेदी करुन उपयोग नाही. शेतकऱ्यांना कोंबड्यांचे अन्न, पाणी, रहाण्याची जागा, स्वच्छता आणि आजारापासून बचवा या बाबी देखील पहाव्या लागतात. अंडी विक्रीसाठी आजूबाजूला मार्केट असणे देखील गरजेचे असते. त्यामुळे नुकसानाची शक्यता कमी होते.
Source: TV9 Marathi National






