Hashtagintro

Pradeep Purnekar Death Case : प्रदीप पूर्णेकर हत्याप्रकरण; राम पूर्णेकरांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

Pradeep Purnekar Death Case : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे ठाण्यातील नेते प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्याप्रकरणी ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आज (दि. १ नोव्हेंबर) प्रदीप पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ठाण्यात भेट घेतली.

मारेकऱ्यांना सरकार पाठीशी घालणार नाही : मुख्यमंत्री

ठाण्यात महायुतीच्या वतीने लोकतंत्र बचाव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ठाण्यात उपस्थित असतानाच, पूर्णेकर यांचे पुत्र राम पूर्णेकर यांनी त्यांची भेट घेतली. “या प्रकरणातील दोषींना सरकार पाठीशी घालणार नाही, आरोपींना कठोर शिक्षा करून पूर्णेकर कुटुंबाला पूर्ण न्याय मिळवून दिला जाईल,” अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदेंवर गंभीर आरोप

२९ सप्टेंबर २०२६ रोजी रात्रीच्या सुमारास मानपाडा येथील जनसंपर्क कार्यालयात घुसून पाच हल्लेखोरांनी प्रदीप पूर्णेकर यांच्यावर गोळीबार केला होता. त्यांच्या शरीरात चार गोळ्या घुसल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पूर्णेकर कुटुंबीयांनी ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांच्यावर हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात शिंदे दाम्पत्याला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीयांनी केली आहे.

राम पूर्णेकरांनी केला होता एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याचा प्रयत्न

राम पूर्णेकर यांनी यापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटण्याचा प्रयत्न केला होता. मात्र तत्‍पूर्वीच ठाणे पोलिसांनी त्‍यांना ताब्‍यात घेतले होते. वडिलांच्या मारेकऱ्यांना शोधून त्यांना कठोर शिक्षा द्या आणि आम्हाला न्याय मिळवून द्या, अशी मागणी पूर्णेकर कुटुंबीयांकडून सातत्याने केली जात आहे. काही दिवसांपूर्वी कुटुंबीयांनी पोलिस ठाण्याबाहेर आंदोलन करत न्यायासाठी आवाज उठवला होता.

राजेंद्र आणि मीनाक्षी शिंदेंच्या अटकेची मागणी

शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी ठाण्यात जाऊन पूर्णेकर कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन केले. पूर्णेकर हत्या प्रकरणात शिंदे गटाच्या नेत्या मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांना अटक करण्याची मागणी ठाकरे गटाकडून केली जात आहे. पूर्णेकर कुटुंबीयही या मागणीवर ठाम आहे.

Source: Pudhari News

Read full article on Pudhari News

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language