Hashtagintro

Prahaar Box Office Collection : ललित प्रभाकरच्या ‘प्रहार’ची परिस्थिती बिकट, प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे मोठे नुकसान? 9व्या दिवशी…

Prahaar Box Office Collection  : ललित प्रभाकरच्या ‘प्रहार’ची परिस्थिती बिकट, प्रेक्षकांनी पाठ फिरवल्यामुळे मोठे नुकसान? 9व्या दिवशी…

अभिनेता ललित प्रभाकर आणि राजकुमार राव चा ‘प्रहार – द उज्वल निकम स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कामगिरी करण्यात अपयशी ठरताना दिसत आहे. चित्रपटाचा विषय आणि कलाकारांची फळी पाहता चांगल्या कमाईची अपेक्षा होती. मात्र पहिल्या आठवड्यापासून चित्रपटाचा वेग मंदावला आणि बॉक्स ऑफिसवर त्याची कामगिरी निराशाजनक ठरली.

मूव्ही टॉकीजच्या वृत्तानुसार चित्रपटाने पहिल्या सहा दिवसांत अंदाजे 15.25 कोटी रूपयांची कमाई केली होती. गुरूवारच्या कमाईनंतर सात दिवसांची एकूण कमाई 16.65 कोटी रूपयांपर्यंत पोहोचल्याचं नमूद करण्यात आलं आहे.

‘प्रहार’ ने 16 ऑक्टोबर रोजी चित्रपटगृहांत प्रवेश केला. पहिल्या दिवशी चित्रपटाने सुमारे 2 कोटी रूपये कमावले. त्यानंतर शनिवार आणि रविवारी कमाईत वाढ झाली. मात्र आठवड्याच्या सुरूवातीला चित्रपटाला ही गती कायम ठेवता आली नाही.मंगळवारी काहीशी वाढ दिसली,पण बुधवार आणि गुरूवारी कमाई पुन्हा घसरली.

या चित्रपटांत राजकुमार राव यांनी ज्येष्ठ सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची भूमिका साकारली आहे. अविनाश अरूण यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून वामिका गब्बी, जयदीप अहलावत, ललित प्रभाकर आणि सिकंदर खेर हे कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये आहेत. 1993 मधील मुंबई बॉबस्फोट आणि 26 नोव्हेंबर 2008 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याशी संबंधित कायदेशीर लढ्यांच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा पुढे जाते.

मू्व्ही टॉकिजच्या अंदाजानुसार, चित्रपटाची एकूण कमाई सुमारे 25 कोटी रूपयांपर्यंत पोहोचू शकते. मात्र पहिल्या आठवड्यातील मंदावलेली कमाई पाहता चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर यश मिळवणं कठीण ठरू शकतं. अंतिम कमाई मात्र पुढील दिवसांत प्रेक्षकांचा प्रतिसाद आणि चित्रपटगृहातील कामगिरीवर अवलंबून असेल.

Source: TV9 Marathi National

Read full article on TV9 Marathi National

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

समाचार की भाषा चुनें / Choose News Language